आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: भर सभेत नेत्‍यावर उगारली बंदूक अन्....

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बल्‍गेरिया- बल्‍गेरियामध्‍ये शनिवारी विरोधी पक्ष मुव्‍हमेंट ऑफ राईट्स अँड फ्रीडमचे नेता अहमद डोगन यांना जिवे मारण्‍याचा प्रयत्‍न झाला. राजधानी सोफिया येथे लोकशाही आणि अधिकार यावर आयोजित एका परिषदेत ते बोलत होते. त्‍याचवेळी एक व्‍यक्‍ती हातात पिस्‍तुल घेऊन मंचावर आला. आणि त्‍याने डोगन यांच्‍यावर पिस्‍तुल रोखली. पहिल्‍यांदा डोगन घाबरले. हल्‍लेखोराने ट्रिगर दाबला परंतु, त्‍यातून गोळी बाहेर आली नाही. तोपर्यंत डोगन यांनी स्‍वत:ला सावरले होते. त्‍यांनी लगेचच त्‍याच्‍यावर उडी मारली. त्‍यामुळे हल्‍लेखोराच्‍या हातातून पिस्‍तुल खाली पडले.

तोपर्यंत परिषदेत बसलेल्‍या लोकांनी आणि सुरक्षारक्षकांनी त्‍या हल्‍लेखोराला पकडले. त्‍याला लाथाबुक्‍यांनी बेदम मारहाण केली. नंतर पोलिसांनी त्‍याला ताब्‍यात घेतले. शनिवारी रात्री उशिरापर्यंत हल्‍लेखोराची ओळख आणि हल्‍ल्‍यामागच्‍या कारणाचा तपास लागू शकला नव्‍हता.