आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gay Marriage Bill Wins Support Of French Lawmakers

फ्रान्समध्ये समलैंगिक विवाहास मंजुरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - समाजसुधारणेच्या नावाखाली फ्रान्सच्या संसदेने शनिवारी धाडसी निर्णय घेतला. विवाहाच्या व्याख्येत सुधारणा करून संसदेने समलैंगिक विवाहाला संमती दिली. या 249 सदस्यांनी या सुधारणेच्या बाजूने मतदान केले तर 97 सदस्यांनी विरोध केला.

सन 1981 नंतर फ्रान्समध्ये सामाजिकदृष्ट्या हा सर्वात मोठा निर्णय आहे.त्यावेळी मृत्युदंडाची शिक्षा कायमची हद्दपार करण्यात आली होती. नव्या व्याख्येनुसार विवाह म्हणजे पुरुष आणि महिला यांच्यातील करार राहिला नसून ‘दोन व्यक्तींमधील करार’ झाला आहे. या प्रस्तावाच्या समर्थनार्थ आणि विरोधात देशभरात आंदोलन झाले होते. जनमत सर्वेक्षणानुसार फ्रान्समध्ये 55 ते 60 टक्के नागरिकांचा या बदलास पाठिंबा आहे. समलैंगिक विवाहास दहा देशांमध्ये सध्या मान्यता आहे. सन 2001 मध्ये सर्वप्रथम नेदरलँडमध्ये या विवाहास कायदेशीर मान्यता देण्यात आली. अमेरिकेच्या सात राज्यांमध्येही या विवाहास मान्यता आहे.