आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्‍ट्रीय वार्ता: ऑस्ट्रेलियातही आता समलैंगिक विवाह बेकायदेशीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅनबरा - भारतानंतर आता ऑस्ट्रेलियातील एका न्यायालयानेही समलैंगिक विवाह बेकायदा ठरवला आहे. ऑस्ट्रेलियातील राजधानी क्षेत्राच्या(एसीटी) असेंब्लीने ऑक्टोबरमध्ये कायदा पारित केला होता. उच्च न्यायालयाने बुधवारी तो बेकायदा ठरवला.
एसीटी असेंब्लिने विधेयक पारित केल्यानंतर समलैंगिक विवाहांना परवानगी देणारे ऑस्ट्रेलियातील हे पहिले राज्य ठरले होते. कायदा अस्तित्वात आल्यानंतर 27 समलैंगिक जोडप्यांनी विवाह केला होता. मात्र आता त्यांचा विवाह आपोआप संपुष्टात आला आहे. एसीटीच्या कायद्याला ऑस्ट्रेलियाच्या केंद्र सरकारने आव्हान दिले होते. या कायद्यानुसार कोणत्याही राज्यात राहणारा ऑस्ट्रेलियन एसीटीमध्ये समलैंगिक विवाह करू शकत होता. विवाह पुरुष आणि स्त्रीमध्येच होऊ शकतो, असे ऑस्ट्रेलियाच्या 2004 च्या कायद्यात स्पष्ट केले आहे. ऑस्ट्रेलियात समलैंगिक विवाहाचे अनेक समर्थक आहेत. पंतप्रधान टोनी एबट यांचा समलैंगिक विवाहाला विरोध आहे. गेल्या वर्षी समलैंगिक विवाहाला मान्यता देण्यासाठी राष्‍ट्रीय संसदेत आलेला प्रस्ताव फेटाळण्यात आला होता.
या देशांत मान्यता : गेल्या वर्षी 7 एप्रिल रोजी न्यूझीलंड समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देणारे आशिया प्रशांत क्षेत्रातील पहिला देश ठरला होता. याव्यतिरिक्त कॅनडा, फ्रान्स, अर्जेंटिना, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिकेतील काही राज्यांमध्येही समलैंगिक विवाह कायदेशीर आहेत.