आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: मृत आईच्या गर्भातून जन्मली सुखरूप, मात्र इस्त्रायलच्या रॉकेटने घेतला जीव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - शायमा शेख अल ईद)

गाझा/जेरूसलेम - इस्त्रायल हल्ल्यामध्ये मारल्या गेलेल्या महिलेच्या गर्भातून काढण्यात आलेल्या मुलीचाही दूर्दैवी मृत्यू झाला आहे. सहा दिवसांपूर्वी गाझाच्या डॉक्टरांनी 23 वर्षाच्या एका गरोदर महिलेच्या गर्भातून या मुलीला सुरक्षित बाहेर काढले होते.
रमजान ईदच्या एक दिवस आगोदर जन्मास आलेल्या या मुलीचे नाव 'शायमा शेख अल ईद' असे ठेवण्यात आले होते. डॉक्टरांनी या मुलीस व्हेंटीलेटरवर ठेवले होते. ईदच्या दिवशी इस्त्राईलने गाझामधील एकच असलेल्या पॉवर स्टेशनला बॉम्ब टाकून उडवण्यात आले. त्यामुळे केवळ तीन दिवसांपर्यंतच्याच विजेचा साठा दवाखान्यात उपलब्ध होता. मात्र गुरूवारी रात्री विज नसल्याकारणाने व्हेंटीलेटर बंद झाले आणि यातच या मुलीचा मृत्यू झाला.
तीन दिवसांचा युध्दविराम केवळ दोन तासातच तुटले
इस्त्रायल आणि हमास यांच्यात गाझा पट्टीत शुक्रवारपासून तीन दिवसांच्या युध्द विरामाची घोषणा करण्यात आली होती. मात्र केवळ दोन तासातच हे युध्द विराम तुटले. हमासवर इस्त्रायली सैन्याच्या अपहरणाचा आरोप लावत इस्त्रायलने गाझा पट्टीवर बॉम्ब हल्ला सुरू केला. प्रत्यूत्तर देताना हमासकडूनही रॉकेट हल्ला करण्यात आला. शुक्रवारी जवळपास 45 पॅलेस्टाईनवासी मारले गेले. या युध्दात आतापर्यंत 1600 लोकांचा मृत्यू झाला आहे. युध्द विरामाची घोषणा अमेरिकेचे विदेश मंत्री जॉन केरी आणि संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून यांनी केली होती.

पुढील स्लाईडवर पाहा, या निष्पाप मुलीचे फोटो...