आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gaza Celebrates After Long Term Truce Agreement, Divya Marathi

IN PICS: संघर्ष समाप्तीच्या घोषणेनंतर गाझावर पुन्हा फुलले जनजीवन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाझावरील युध्‍द समाप्तीच्या घोषणेनंतर पॅलेस्टिनी नागरिकांच्या चेह-यावरील आनंद पुन्हा दिसू लागले आहे. येथे आनंदोत्सव साजरा करण्‍यासाठी लोक रस्त्यांवर उतरले आहेत. आकाशात आतषबाजी, एकमेंकांना आलिंगन आणि दुसरीकडे काहींच्या डोळ्यातून आश्रू वाहत आहेत.

हमास-इस्रायल दरम्यान चालू असलेले हिंसक संघर्ष 50 व्या दिवशी इजिप्तच्या मध्‍यस्थीने युध्‍द थांबवण्‍यास इस्रायलनी तयारी दर्शवली आहे. सात आठवडे चालू असलेल्या प्रदीर्घ हल्ल्यांमध्‍ये 2 हजार 139 पॅल‍ेस्टिनी मारली गेली. यात 500 चिमुकल्यांचा समावेश आहे. इस्रायलची 70 जण मृत्यूमुखी पडले.

हमास या दहशतवादी संघटनेचा पूर्ण नायनाट करण्‍यात अपयश आले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंवर चोहुबाजूंनी टीका चालू आहे. तसेच देशात त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. नेतान्याहू यांनी देशाला दुर्बल बनवले आहे, असे टीकाकार त्यांच्यावर तोफ डागवत आहे. संघर्षामुळे इस्रायलची अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला आहे. त्यामुळे आम्हाला शस्त्रसंधीची आशा आहे, असे मत इस्रायलच्या लोकप्रिय वृत्तपत्र येडिओथमध्‍ये तज्ज्ञ शिमन शिफर यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान गाझावर जन‍जीवन पुन्हा पूर्वपदावर आले आहे. लोक पुन्हा दुकान, बँकांकडे वळली आहेत.
पुढील छायाचित्रांमध्‍ये पाहा आनंदोत्सवात बुडलेल्या गाझाचे दृश्‍य...