आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gaza Israel Protests News In Marathi, Again Bomb Attack

गाझावर ४८ व्या दिवशीही पुन्हा हवाई बॉम्बहल्ले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाझा/जेरुसलेम- इस्रायलने पॅलेस्टाइनवर केलेल्या हवाई हल्ल्यात २ पॅलेस्टिनी मारले गेले. गेल्या ४८ दिवसांपासून सुरू असलेल्या या संघर्षात आतापर्यंत २१०० लोक मारले गेले आहेत.
शनिवारी इस्रायलने साठ हल्ले केले. यात महिला-मुलांसह १० जण मारले गेले होते. त्या तुलनेत रविवारच्या हल्ल्यांचा जोर कमी होता. दरम्यान, इजिप्तने या दोन राष्ट्रांतील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी चर्चा घडून यावी यासाठी दोन्ही बाजूंनी युद्धबंदी जाहीर करावी, असे आवाहन केले आहे. मात्र, दोन्ही बाजूंनी अद्याप या आवाहनास प्रतिसाद मिळालेला नाही. इस्रायल व पॅलेस्टिनी प्रतिनिधींनी या पेचावर तोडगा काढण्यासाठी इजिप्तमध्ये चर्चा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. इस्रायलने रविवारी पॅलेस्टिनी हद्दीत हमास या दहशतवादी संघटनेच्या २० संशयित ठिकाणांवर हल्ले केले. इस्रायली विमानांनी किमान २० रॉकेट किंवा बॉम्ब डागल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात दोन नागरिक ठार व सात जण जखमी झाले. या दोन्ही राष्ट्रांत पॅलेस्टाइनच्या हवाई आिण सागरी सीमांवरून वाद सुरू आहे. पॅलेस्टाइनमधील हमास या दहशतवादी गटाच्या रॉकेट हल्ल्यांपासून कायमची मुक्तता व्हावी हे इस्रायलचे ध्येय आहे.