आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता मिळवा हवे तसे मूल : दिल मिले ना मिले, ‘डीएनए’ जरूर मिलना चाहिए!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- मने जुळली की संसार थाटण्याची पद्धती आता हद्दपार होण्याची वेळ आली आहे. भविष्यात जोडप्यांना केवळ मने जुळली किंवा एखाद्यावर प्रेम जडले म्हणून नाही तर त्यांच्या जनुकाची अनुकूलता पाहूनच जोडीदाराची निवड करावी लागेल, असे संशोधकांनी म्हटले आहे.
जनुकीय रचनेच्या चाचणीचा खर्च झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे आगामी पाच ते दहा वर्षांत तरुणांच्या खिशाला परवडेल अशा खर्चात सहजपणे एकंदर जनुकीय संरचनेची चाचणी करून घेणे आणि आपल्या जनुकीय संरचनेला अनुकूल अशा जोडीदाराची निवड करणे शक्य होईल, असे संशोधकांना वाटते.
आपले बाळ हे सुदृढ असावे, अशी प्रत्येकच आई-वडिलांची इच्छा असते. त्यामुळे आपला जोडीदार निवडण्यापूर्वी त्याच्या जनुकीय रचनेची ब्ल्यूप्रिंट वाचूनच निर्णय घेण्याचा आग्रह वाढेल, असे लंडनच्या इम्पिरिअल कॉलेजचे प्राध्यापक अर्मन्ड लेरोई यांनी म्हटले आहे. जनुकीय रचना बघून जोडीदाराची निवड केल्यामुळे लोकांना बाळाचे आनुवंशिक आजार नियंत्रणात ठेवण्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून आपले बाळ बुद्धिमान किंवा त्याच्या डोळ्याचा रंग हवा तसा विकसित करण्यावर जास्त लक्ष केंद्रित करता येणे शक्य होणार असल्याचे डॉ. लेरोई यांनी म्हटल्याचे ‘डेली मेल’च्या वृत्तात म्हटले आहे. लोकांच्या जनुकीय संरचनेत सुधारणा घडवून आणणारे युजनिकशास्त्र आहे. आजारपण किंवा सामाजिक कुप्रथेमुळे दरवर्षी जगामध्ये हजारो भ्रूणांचे गर्भपात करण्यात येत आहेत, असे लेरोई यांनी युरो-सायन्स ओपन फोरम 2012 मध्ये सहभागी होताना सांगितले.
कल्पनेला विरोध आणि सर्मथनही- जनुकीय अनुक्रम माहीत करून घेण्याच्या खर्चात झपाट्याने कपात होत आहे. त्यामुळे ही चाचणी करून घेणे लवकरच सर्वसामान्यांच्या आवाक्यात येईल. परिणामी सुदृढ संततीसाठी लोक मने जुळली म्हणून नव्हे तर जनुकीय अनुकूलता पाहूनच जोडीदाराची निवड करायला प्राधान्य देतील.’’ - डॉ. अर्मन्ड लेरोई, हॉर्वर्ड मेडिकल स्कूल
- सगळी जनुके काढून टेबलावर ठेवा, त्यातील जे सवरेत्कृष्ट असेल त्याची आम्ही निवड करू, काही संस्कृतीतील लोक म्हणतील, तर काही जणांना हा ईश्वरी इच्छेची प्रतारणा असल्याचे वाटेल.’’ - डॉ. लोन फ्रँक, संकल्पनेचे विरोधक
- आपला समाज सामाजिक दर्जा, शारीरिक सुदृढता आणि सौंदर्यालाच जास्त महत्त्व देते. शारीरिकदृष्ट्या अपंग किंवा आनुवंशिक आजाराने ग्रस्त लोकांच्या जगण्याला त्यांच्या दृष्टीने काहीही महत्त्व नाही. आनुवंशिक आजारांना पायबंद घालण्यावर आपला भर असायला हवा. जन्माला येण्यापूर्वीच त्यांना नष्ट करण्याची मनोवृत्ती बदलायला हवी.’’ - फिलिप टेलर, ख्रिश्चन मेडिकल फेलोशिप
संशोधन : वियाग्राचे काम करतो डाळिंबाचा रस