आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Georgia Devis : 19 Years Old Girl Life Limited In Chair

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जॉर्जिया डेव्हिस : 19 वर्षांच्या वयात एका खुर्चीपुरतेच मर्यादित होते विश्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


292 किलो वजन असलेली जॉर्जिया डेव्हिस तीन दिवसांपासून रुग्णालयात आहे. 19 वर्षांच्या जॉर्जियाला या खुर्चीवरून उठताही येत नव्हते. पायांमध्ये प्रचंड वेदना. चार वर्षांपूर्वी डॉक्टरांनी सक्तीने तिच्या खान-पानावर नियंत्रण आणून वजन 95 किलो घटवले होते. तिला केवळ 1500 कॅलरी घेण्यास सांगण्यात आले. मात्र, जॉर्जियाचे नियंत्रण राहिले नाही. तिने घ्यायला सुरुवात केली 13000 कॅलरीज. मागील वर्षीच्या मे महिन्यात तिचे वजन 330 किलो झाले होते. रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ आली तेव्हा घराचा एक भाग तोडून तिला बाहेर काढावे लागले होते. शस्त्रक्रियेसाठी खर्च आला एक लाख पाऊंड (82 लाख रुपये). तिच्यावर होणारा सर्व खर्च सरकार उचलत आहे. मी स्वत: जेवण तयार करू शकत नाही. त्यामुळे पॅक्ड फूडवरच अवलंबून असते, असे जॉर्जिया सांगते.