आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • German Auto Maker Mercedez Benz News In Marathi, Divya Marathi

अबब ! २५० टनांचा भार वाहून नेणारा ट्रक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका ट्रकची क्षमता किती असू शकते, हे त्याच्या इंजिन आणि बनावटीवर अवलंबून असते. ट्रकद्वारे कोणते काम करून घ्यायचे आहे, हे ठरवावे लागते. काही ट्रक वजन वाहून नेण्याचे काम करतात. काही खदाणीच्या कामासाठी वापरले जातात. जर्मन ऑटो मेकर मर्सिडीझ बेंझ या कंपनीने टि्वटरवर एका मोठ्या वजनदार ट्रकचा फोटो पोस्ट केला आहे. कंपनीच्या अॅक्ट्रोस मॉडेलचे हे छायाचित्र आहे. या ट्रकची मालवाहतूक करण्याची क्षमता २५० टन इतकी आहे. महामार्गावर जाताना या ट्रकच्या वर मोठ्या चाकाचा ट्राला ठेवण्यात आला आहे.
यामुळे जास्तीचे वजन वाहून नेण्याचे काम करू शकतो. हा फोटो टाकतानाच कंपनीने म्हटले आहे की, या ट्रकचा हळू आवाजही तुम्ही ऐकू शकणार नाही. परंतु फोटो पाहूनच याच्या क्षमतेचा अंदाज येईल.

motorauthority.com