आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: जर्मनीच्या मॉलमध्ये अश्मयुगीन मानव खरेदीला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर्मनीच्या अल्बर्स गावात पाषाणयुग काळातील संस्कृतीचे दर्शन घडवणारे भव्य पार्क उभारण्यात आले आहे.पाच हजार वर्षांपूर्वी अश्मयुगात मानवाने जगण्यासाठी केलेला संघर्ष आपल्यालाही अनुभवण्याची संधी मिळू शकते.

अल्बर्सचीच का निवड ?
दिथमार्शेन प्रदेशातील अल्बर्स गाव आणि एकंदरच हा प्रदेश अत्यंत दुर्गम भाग आहे. पाषाणयुगातील अनेक वास्तू याठिकाणी अद्याप आहेत. मानवाने उभारलेली घरे येथे आहेत. अर्थात या घरांची आता डागडुजी करण्यात आली आहे. पण हजारो वर्षांपूर्वी मानवाचे आयुष्य कसे होते याचा जिवंत अनुभव मिळतो.

स्वयंसेवक पाषाणयुगातले
पार्कमधील स्वयंसेवकांचा पेहरावही पाच हजार वर्षांपूर्वीचा आहे.जनावरांच्या कातड्यांसारखे वस्त्र, दगडांची हत्यारे,धनुष्यबाण, घरे या ठिकाणी आहेत.आपल्याला इथे त्या काळातील दागदागिने, हस्तकला शिकता येते.धनुष्यबाणाने शिकार करण्याचाही अनुभव घेता येतो.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, आणखी छायाचित्र..