आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर्मनीचा निर्दयी हुकूमशहा हिटलर होता शाकाहारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - दुस-या महायुद्धाच्या काळात पोलंडमधील वास्तव्यात हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलरने शाकाहाराला महत्त्व दिले होते. तो शाकाहारी होता, असा दावा करण्यात आला आहे. 95 वर्षीय मार्गोट ओवेक या महिलेने हा दावा केला आहे. अन्नाची चव बघणा-या टीममधील त्या सदस्य होत्या.

मार्गाट ओवेक यांनी हा काळ पाहिला आहे. मूळच्या जर्मन असलेल्या ओवेक यांचे पती हिटलरच्या सैन्यात होते. त्या काळात हिटलर वुल्फ्स लेअर येथील लष्करी तळावर राहिले होते. हिटलरच्या पाकगृहाची जबाबदारी काही महिलांकडे होती. महिलांच्या या गटात ओवेक यांनी काम केल्याने त्यांनी या हुकूमशहाच्या खाण्यापिण्याच्या सवयी जवळून पाहिल्या आहेत. त्यांना शाकाहारी पदार्थ तयार करण्यास सांगितले जात. हिटलर 1941 ते नोव्हेंबर 1944 या दरम्यान या भागात राहिला होता.

विषप्रयोगाची भीती : हिटलरवर विष प्रयोग होण्याची भीती असल्याने विशिष्ट महिलांकडे त्याची जबाबदारी होती. महिलांनी तयार केलेले जेवण ओवेक यांना 11 ते 12 या काळात त्याची चव चाखून बघावी लागत असे.

कोणत्या पदार्थांचा समावेश
भात, सलाड, मिरची, मटर यांचा समावेश जेवणात असायचा. जेवणात कधीही मटन दिल्याचे आपल्याला आठवत नसल्याचे ओवेक यांचे म्हणणे आहे.

त्यांच्यासाठी आमचा जीव धोक्यात
विषाचा प्रयोग झाला असता तर आता मी जिवंत नसते. आम्हाला अन्नाची चव चाखणे अनिवार्य केलेले होते. दुसरा काहीही पर्याय त्या वेळी आमच्यासमोर नव्हता.
मार्गाट ओवेक, सैन्यातील जवानाची पत्नी.