आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्न करताय? आधी ‘लव्ह टेस्ट’ करा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेलाहैसी - प्रेम विवाह असो की नियोजित विवाह. लग्नानंतर संसार सुखाचा होईल की नाही यावरून प्रत्येकाच्याच मनात हुरहुर असते. पण जोडीदाराचे आपल्यावर किती प्रेम आहे, हेही तपासून पाहण्यासाठी आता एक खास परीक्षा घेता येणार आहे. फ्लोरिडातील जेम्स मॅकनल्टी या संशोधकाच्या दाव्यानुसार, त्यांनी विकसित केलेल्या ‘लव्ह टेस्ट’ ने नवदांपत्याला परस्परांविषयीचे विचार जाणून घेता येतात.
फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक जेम्स यांच्या मते, जोडीदाराच्या छायाचित्रावरून सुप्त मनात उमटलेल्या प्रतिक्रियेद्वारे लग्नानंतरच्या आयुष्याविषयी अंदाज लावता येतो. लग्नानंतर आपण आनंदी राहू किंवा नाही याचा अंदाज लावण्यासाठी मनातील प्रतिक्रिया खूप महत्त्वाची ठरू शकते. संशोधकांच्या टीमने 135 दांपत्यांची लग्नानंतर काही दिवसांतच मुलाखत घेतली. लग्नाचे मूल्यांकन करण्यासाठी सकारात्मक, नकारात्मक, चांगले, वाईट, समाधानकारक व असमाधानी असे पर्याय देण्यात आले. या उत्तरांवरून त्यांनी एखादे कोडे सोडवावे त्याप्रमाणे जोडीदारांविषयीच्या भावनांचा अंदाज घेतला.