आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिक सेल्फीतून रजा मिळवा, बॉसला पाठवा थेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - तब्येत ठीक नसल्यामुळे ऑफिसला जाण्याची इच्छा नसल्यास आता फार विचार करण्याची गरज नाही. बॉसला थेट सिक सेल्फी पोस्ट करा आणि आपली प्रकृती बरी नसल्याची जाणीव करून द्या. एका सर्वेक्षणानुसार ट्विटरच्या हॅश टॅग सिक सेल्फीवर अनेक जण प्रकृती बरी नसल्याचे सांगण्यासाठी फोटो पोस्ट करत आहेत.
संशोधकांनी १८ ते ४५ वर्षे वयोगटातील २३०० लोकांना या सर्वेक्षणात प्रश्न विचारले. स्मार्ट फोनधारकांना यात सहभागी करून घेण्यात आले. निष्कर्षानुसार, ५० टक्के लोकांनी प्रकृती बरी नसल्यावर सिक सेल्फी टाकत असल्याचे मान्य केले, तर १५ टक्के लोकांनी मित्रांची सहानुभूती मिळवण्यासाठी सिक सेल्फी टाकल्याचे मान्य केले.