आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताला मिळणार समृद्ध युरेनियम, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान गिलार्ड यांची ग्वाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - भारताला युरेनियम विक्री करण्यासंदर्भातील चर्चा द्विपक्षीय पातळीवर योग्य दिशेने चालू आहे, असे ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांनी स्पष्ट केले.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात युरेनियमची चर्चा आम्हाला अपेक्षित असलेल्या दिशेने सुरू आहे. निर्णयासाठी अडथळा ठरणार्‍या समस्यांना दूर करणे ही महत्वाची गोष्ट आहे. सध्या दोन्ही देश सुरक्षाविषयक करारावर काम करत आहेत. त्यासाठी आणखी काही वेळ द्यावा लागेल. परंतु चर्चा सुरू आहे, असे 51 वर्षीय गिलार्ड यांनी सांगितले. एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना गिलार्ड यांनी रविवारी ही भूमिका मांडली. जगातील एकूण युरेनियमपैकी मोठे उत्पादन एकट्या ऑस्ट्रेलियात होते. त्यामुळे देशातून सुमारे 7 हजार टन युरेनियम दरवर्षी निर्यात केले जाते.

अनिवासी भारतीयांची संख्या अधिक
ऑस्ट्रेलियातील अनिवासी भारतीयांची संख्या इतर देशांच्या तुलनेने अधिक आहे. यंदा हे प्रमाण 12.7 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे. सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या अहवालात भारताने चीनला पिछाडीवर टाकले आहे. ऑस्ट्रेलियाज मायग्रेशन ट्रेंड 2011-12 असे अहवालाचे नाव आहे. भारतीयांची संख्या 29, 018 आहे तर चीनची 25, 509 आहे.