आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामूहिक बलात्काराचे छायाचित्रे इंटरनेटवर अपलोड; तरुणीची आत्महत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल हार्बर- 17 वर्षीय रेहतेह पार्संस नामक तरुणीवर गेल्या 15 महिन्यांपूर्वी तिच्या घरातच चार नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्या होता. बलात्कार करून हे नराधम थांबले नाहीत तर दुष्कर्म करताना त्यांनी पीडित रेहतेह पार्ससची छायाचित्रेही काढली होती. विशेष म्हणजे त्यांनी ती छायाचित्रे इंटरनेटवर अपलोड केली होती. इंटरनेटवर छायाचित्रे झळकताच तिकडे पीडित रेहतेह पार्सस हिने गळफास लावून आत्महत्या केली. गेल्या रविवारी ही घटना घडली होती. पो‍लिसांकडे ठोस पुरावे असूनही ते नराधमांवर कारवाई करत नसल्याचा आरोप पीडित कुटूंबीयांनी केला आहे.

आपल्या मुलीने आत्महत्या केल्यानंतरही तिच्या न्याय मिळत नसल्याचे पाहून रेहतेहची आई लेह पार्संस हिने सोशल मीडियासमोर न्याय मागितला आहे. 'फेसबुक'वरील जनतेच्या भडकलेल्या ज्वाला आता कनेडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर यांच्यापर्यंत पोहचल्या आहेत. हार्पर यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करण्‍याचे आदेश दिले आहेत.

कॅनडातील राज्य नोवा स्काटियामधील कोले हार्बर हे एक शहर आहे. बलात्काराची घटना घडल्यानंतर पीडित रेहतेह पार्सस हिने शाळेत जाणे शोडले होते. मानसिक धक्का पोहचल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यातही आले होते. परंतु अखेर तिने राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केली.