आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅनडात निर्भयाप्रकरणाची पुनरावृत्ती, मीडियावरील बदनामीमुळे पीडित युवतीची आत्महत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलहार्बर- दिल्लीत गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये घडलेल्या निर्भया प्रकरणाची कॅनडात पुनरावृत्ती झाली आहे. तेथे 17 वर्षीय युवती रेहतेस पार्सस हिचे 15 महिन्यांपूर्वी चार युवकांनी अपहरण करून तिला तिच्यावर बलात्कार केला. एवढ्यावरच ते नराधम थांबले नाहीत तर त्यांनी ही छायाचित्रे फेसबुकवर तसेच इंटरनेटवरही टाकली. यामुळे त्या युवतीला जबर मानसिक धक्का बसला. नैराश्याने घेरलेल्या या युवतीने गेल्या रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

कॅनडातील नोवा स्काटिया राज्यातील कोले हार्बर या शहरातही घटना घडली. मुलीच्या आई वडिलांनी वारंवार आग्रह धरूनही ठोस पुरावे नसल्याचे कारण सांगत आरोपींविरोधात कारवाई केली नाही. आता या विरोधात प्रचंड असंतोष पसरल्यानंतर त्याची नव्याने चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपली मुलगी गमावल्यानंतर आईने तिला न्याय देण्यासाठी दु:ख आवरत मोहिम हाती घेतली. लेह पार्संस असे या मातेचे नाव असून त्यांनी त्यांचे म्हणणे फेसबुकवर मांडले. या प्रकरणाचा पाहता पाहता वणवा झाला आणि आता कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर यांनाही नागरिकांच्या असंतोषाचा सामना करावा लागत आहे. पोलिस आणि पंतप्रधानांची सफाई देताना दमछाक होत आहे. हार्पर यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

आरोपींविरोधात नाराजी
रेहतेहची आई लीहचे म्हणणे असे की, तिच्या मुलीची व्यथा जाणून घेतल्यानंतर जगभरातून लोक शोक व्यक्त करत आहेत. त्याचा दबाव वाढत चालल्याने प्रकरणाच्या चौकशीस गती मिळाली आहे. कॅनडातील विरोधी पक्षांनीही हे प्रकरण असंवेदनशीलतेने हातळल्याबद्दल सरकार, पोलिसांवर टीकेची झोड उठवली आहे.

सरकार अडचणीत आले
नोवा स्काटिया राज्याचे प्रीमियर डेरेल डेक्सटर यांनी शिक्षण, न्याय, कम्युनिटी सर्व्हिसेस व आरोग्य या चार सरकारी विभागांना रेहतेहच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अत्याचार करणार्‍या युवकांची तसेच प्रकरणाचा तपास करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांचीही कसून चौकशी करण्यात येत आहे. असंतोष वाढत असल्याने सरकारने नागरिकांना कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले आहे.