अल्बुक्वेर्क- 'प्रेमा तुझा रंग कसा!' याचा आणखी एकदा प्रत्यय आला आहे. एका प्रेयसीने ब्रेकअपनंतर आपल्या एक्स बॉयफ्रेंडला एक आठवड्यात तब्बल 77 हजार 639 वेळा फोन केल्याचे समोर आले आहे. ही घटना आहे, मॅक्सिकोची रहिवाशी 28 वर्षीय लिंडा मर्फी आणि विल्यम रेयान्स या दोघांची.
'एक दुजे के लिये' म्हणत दोघांनी आनाभाकाही घेतल्या होत्या. मात्र, जे व्हायचं नाही तेच झालं. दोघांमध्ये काही कारणावरून बिनसलं. अखेर वादाचा शेवट ब्रेकअपनेच झाला. दोन्ही विभक्त झाले. मात्र, ब्रेकअपनंतरचा प्रकार तर फारच गंमतीशीर आहे.
ब्रेकअपनंतर लिंडाला स्वत:ला सांभाळणे फारच अवघड झाले होते. विल्यमसोबत शेवटचे बोलण्याची लिंडाची इच्छा होती. मात्र, विल्यम तिचा फोन रिसिव्ह करत नव्हता. लिंडा त्यामुळे आणखीच बैचेन झाली होती. त्यानंतर तिने विल्यमला एका आठवड्यात तब्बल 77 हजार 639 वेळा फोन केले. एवढेच नव्हे तर 41 हजार 229 टेक्स्ट मेसेजस, एक हजार 937 ई-मेल्स, 217 व्हाइस मेसेजस आणि 647 पत्रे पाठवली. परंतु विल्यमने तिला एकदाही प्रतिसाद दिला नाही.
एका इंग्रजी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, विल्यमपासून विभक्त होण्याची कल्पनाच लिंडाला सहन होत नव्हती. तिची झोप उडाली होती. लिंडाने भरपूर प्रमाणात एनर्जी ड्रिंक्स घेऊ लागली. त्यात तिचे स्वत:वरील नियंत्रण सुटत होते. लिंडा आपल्या तीन मोबाइलवरून विल्यमच्या तिन्ही फोनवर कॉल करत होती. मात्र, तो तिला प्रतिसाद देत नसल्याने ती आणखीच बैचेन झाली. लिंडा नित्यनेमाने विल्यमला फोन करतच होती. मात्र, दुसरीकडे, लिंडाच्या या वेडेपणामुळे विल्यम खासगी आयुष्यासोबत ऑफिस लाइफ प्रचंड डिस्टर्ब झाली होती.
विल्यमची अवस्था पाहून त्याच्या सहकार्यांनी अखेर पोलिसांना सगळा प्रकार सांगितला. नंतर पोलिसांनी लिंडाला अटक केली. लिंडा एक मानसिक रुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले.
(फाइल फोटो)