आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साम्यवादी चीनमध्ये मुलींना शिकता येत नाहीत ‘मुलांचे’ विषय!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- गेल्या 100 वर्षांचा आढावा घेतल्यास जगभरात महिलांनी अनेक क्षेत्रांत यशोशिखर गाठले. मात्र, आपल्या असामान्य कर्तृत्वानंतरही त्यांना राजकारण, सांस्कृतिक आणि सामाजिक आघाड्यांवर पुरुषांच्या तुलनेत खडतर आव्हानांना सामोरे जावे लागल्याचे स्पष्ट होते.

एका वृत्तवाहिनीने जगभरातील महिलांची स्थिती जाणून घेतली. यामध्ये चीनमधील महिलांच्या बाबतीत काही आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या. ब्यूटिशियन किंवा वकील? केक डेकोरेटर किंवा रेडिओ होस्ट? चीनमध्ये आजकाल ‘आय हॅव ए ड्रीम’ थीम पार्कमध्ये मुलांना करिअरच्या वेगवेगळ्या पर्यायांची माहिती दिली जात आहे. येथे छोट्या मुलींना हवाई सुंदरीसारखा पोशाख घालण्याची पद्धत शिकवली जात आहे. याशिवाय मुलांना सुरक्षा रक्षक किंवा कस्टम एजंट होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. या काल्पनिक जगाबाहेर चीनमध्ये स्त्री-पुरुषांत भेदभाव केला जातो, हे वास्तव आहे.

‘फक्त पुरुषांसाठी’ अभ्यासक्रम
मुले आतापर्यंत करत आलेली कामे मुलींनी करू नयेत, अशी चीनच्या पारंपरिक विचाराच्या लोकांची धारणा आहे. चीनमध्ये अनेक विद्यापीठे व अन्य क्षेत्रांमध्येही महिलांच्या बाबतीत असाच दृष्टिकोन बाळगला जातो. बीजिंगहून 600 कि.मी. अंतरावर जिआंसू राज्यात चिनी खाण आणि तंत्रज्ञान विद्यापीठ आहे. येथे मायनिंग इंजिनिअरिंगचे काही विद्यार्थी एका प्रोफेसरचे लेक्चर शांततेत ऐकत होते. हे विद्यार्थी अन्य विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी ईर्षेचा विषय आहेत. याचे कारण म्हणजे ते एक विशिष्ट अभ्यासक्र ‘ग्रीन कार्ड मेजर्स’ शिकत आहेत. पदवीनंतर त्वरित रोजगार उपलब्ध करून देणार्‍या या अभ्यासक्रमाला त्यामुळे विशेष महत्त्व आहे. मात्र, हा अभ्यासक्रम केवळ पुरुषांसाठी या गटात येत असल्यामुळे मुलींची इच्छा असून त्यांना प्रवेश मिळत नाही. यासंदर्भात विद्यापीठातील वरिष्ठ प्रोफेसर म्हणाले, चीनचा कामगार कायदा खाणकामासाठी महिलांना अनुकूल मानत नाही. त्यामुळे मायनिंग इंजिनिअरिंग हा विषय पुरुषांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आला आहे.

सुरुंग व नौकानयन : चिनी महिलांच्या बाबतीत पारंपरिक दृष्टिकोन स्वीकारणारे हे एकमेव विद्यापीठ नाही. महिलांना सुरुंग व नौकानयन यांसारख्या विषयांपासून दूर ठेवले जावे, असे अनेक विद्यापीठांचे म्हणणे आहे. उत्तर चीनमध्ये डलियन विद्यापीठ आहे. येथील मुली नेव्हल इंजिनिअरिंग शिकू शकत नाहीत. महिलांनी अनेक महिन्यांसाठी जहाजावर काढणे कठीण आहे, असे या विद्यापीठाच्या प्रशासकीय अधिकार्‍याचे म्हणणे आहे.

महिला पोलिस मान्य नाही
पीपल्स पोलिस युनिव्हर्सिटीच्या प्रवेश अधिकार्‍याने सांगितले की, महिलांना पदवीनंतर रोजगाराच्या संधी फार कमी उपलब्ध होतात. याव्यतिरिक्त चीनमध्ये लोक महिलांना पोलिसाच्या रूपात पाहू इच्छित नाहीत.

महिलांना पाठिंबा
चीनमध्ये महिलांना ठरावीक विषयापासून दूर ठेवण्याच्या पद्धतीशी सहमत नाहीत. विद्यार्थी व वकिलांचे छोटे, परंतु शक्तिशाली नेटवर्क महिलांवरील बंधनाचा विरोध करत आहेत. कोणी कठीण काम करण्यात स्वत:ची क्षमता सिद्ध करत असेल तर त्याला ते करू द्यायला हवे, असे एक विद्यार्थी म्हणाला.