आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला आनंदी ठेवण्यासाठी द्या मुलांना वेळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - मुलांसोबत भरपूर वेळ घालवणे आणि पत्नीला घरकामात हातभार लावल्यामुळे पत्नी आनंदी आणि समाधानी राहते, असे एका नव्या अध्ययनात समोर आले आहे.

ब्रिंघम यंग विद्यापीठ, मिसुरी विद्यापीठ आणि उटाह विद्यापीठांच्या संशोधकांनी 160 कुटुंबे घरकाम आणि मुलांशी संबंधित कर्तव्यांची हाताळणी कशी करतात यासंबंधीचे अध्ययन केले. त्यापैकी बहुतांश पालक 25 ते 30 वयोगटातील आहेत आणि त्यांना पाच वर्षे किंवा त्यापेक्षा लहान मूल आहे. सुखी वैवाहिक जीवनाचे रहस्य
पालकत्वाच्या संक्रमणकाळात पती- पत्नी घरकामात स्वत:ला अधिकाधिक झोकून देतात, असे आढळून आले होते. घरात पहिल्या मुलाचे आगमन होताच वडील दुप्पट घरकाम करतात तर आई पाचपट अधिक घरकाम करते. घरातील कामाची विभागणी झाल्याने दांपत्य जीवनातील संबंध सुधारतात आणि आनंद संचारतो. कोण काय काम करतो हे महत्त्वाचे नाही तर कामाची विभागणी आनंदास कारणीभूत ठरते, असे ब्रिंघम यंग विद्यापीठाचे एरीन होलमेस यांनी म्हटले आहे.

लहान मूल सांभाळणे हा आव्हानात्मक टप्पा
दररोज रात्री मुलांबरोबर एखादे पुस्तक वाचणे आणि त्यांच्या दैनंदिनीविषयी चर्चा करणे यासारख्या साध्या बाबींचाही पती-पत्नीच्या वैवाहिक संबंधावर दीर्घकालीन परिणाम पडतो. मूल झाल्यानंतरचा काळ दांपत्याच्या जीवनातील खरोखरच आव्हानात्मक टप्पा असतो.
अ‍ॅडम गालोव्हॅन, ब्रिंघम यंग विद्यापीठ