आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Giving Up Your Job: Is There Life After The Office

पुरूषांप्रमाणे वागता येत नसल्याने महिला सोडतात लवकर नोकरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिला लवकर नोकरी का सोडतात या विषयावर एक रिसर्ज करण्यात आला आहे. या रिसर्जनूसार, कामाच्या ठिकाणी असणा-या पुरूषी संस्कृतीमुळे महिला लवकर नोकरी सोडतात कारण पुरूषांप्रमाणे वागणे त्यांना जमत नाही.
'जेंडर वर्क अ‍ॅन्ड ऑर्गेनाइझेशन' जर्नलमध्ये प्रकाशित या रिपोर्टनूसार आई झाल्यानंतर ऑफिसमधील सहका-यांसोबत संध्याकाळचा वेळ घालवणे महिलांना आवडत नाही. हा अहवाल लीसेस्टर विद्यापिठाने सादर केला आहे.
मुलाखती घेतल्या गेल्या
हा रिपोर्ट सादर करणा-या अभ्यासकांनी लंडनमधील 25 महिलाच्या मुलाखती घेतल्या. या महिलांनी गरोदर असताना किंवा प्रस्तूतीनंतर नोकरी सोडली होती. काही महिलांनी पहिले मुल शाळेत जायला लागल्यावर पुन्हा नोकरीस सुरवात केली मात्र त्यांना ऑफिसमध्ये पूर्वीचे स्थान मिळाले नाही.
यापैकी 21 महिलांनी कामाला पुन्हा सुरवात केल्यानंतर स्वत:च्या इच्छेने नोकरी सोडली. काम संपले असतानाही त्यांना अधिक वेळ थांबण्यास सांगितले जात असल्याने नोकरी आणि मातृत्वाची जबाबदारी एकाच वेळी सांभाळणे शक्य नसल्याचे या महिलांचे म्हणणे आहे.