आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Global Brain Institute News In Marathi, Divya Marathi, Washington

भविष्यात मोठ्या आकाराच्या मेंदूची मुले, जगणार १२० वर्षे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - लालभडक डोळे, मोठे डोके आणि सरासरी आयुष्यमान १२० वर्षे अशी असेल आगामी काळात मानवाची ओळख. २०५० च्या आसपास अशी नवी पिढी जन्म घेऊ लागेल. एवढेच नव्हे, या पिढीमध्ये प्रजोत्पादनाची क्षमताही अिधक असेल. ग्लोबल ब्रेन इन्स्टिट्यूटच्या नव्या अभ्यासाच्या निष्कर्षांमध्ये हा दावा करण्यात आला आहे.

संशोधक कॉडेल लॉस्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार आधुिनक काळात तंत्रज्ञान, पर्यावरण आणि जीवनमानात होत असलेले वेगवान बदल मानवी विकासाचा नवा टप्पा घेऊन आले आहेत. ही मानव जातीची नवी संक्रमण अवस्था आहे. येत्या ३५ वर्षांत मानवी जीवन आणि त्याचे शरीर यात मोठे बदल घडून येणार आहे.

रोबोट चालवतील कार, दुकाने
२०१४ मध्ये रस्त्यावर धावणाऱ्या कार गुगलचे रोबोट चालवतील. दुकाने आणि शोरूम केवळ नावालाच असतील. कारण, रोबोट कॉल सेंटरवर काम करतील आणि त्या-त्या सेवा संबंिधतांना देतील.

कसे बदलेल जीवन
* आगामी काळात मानव बहुतांश कामांसाठी रोबोटवरच विसंबून राहील.
* उशिरा मातृत्व मिळण्याची हमी असल्याने या लोकांकडे कौटुंिबक जबाबदाऱ्या उशिरा येतील. त्यामुळे त्यांच्याकडे वेळही खूप असेल.
* या वेळेचा उपयोग लोक सामािजक कार्यासाठी करतील.
* आभासी जगाशी या लोकांची नाळ जोडली जाईल.

जीवनाचा वेगही मंदावेल
वानरापासून हळूहळू बदल होत माणसाची निर्मिती झाल्याचे मानले जाते. आगामी काळात मानवी बदलाची अशीच अवस्था असेल. संशोधकांच्या मते, सद्य:स्थितीत लोकांचे जीवन अत्यंत वेगवान आहे. रोज जगतानाची धडपड आणि धावपळीमुळे लोक लवकर म्हातारे होतात आणि त्यांचे जीवनही लवकर संपते. चार दशकांनंतर मात्र ही अवस्था बदललेली असेल. लोकांचे आयुष्यमान हळूहळू वाढत जाणार आहे.

चिंता शक्ती वाढवण्याची
या रोबोटच्या दुनियेत माणसाला चिंता असेल ती आपल्या शक्तीची. रोबोटपेक्षाही अिधक शक्तीने आणि वेगाने काम करता यावे म्हणून मेंदूची क्षमता वाढवण्यासाठीचे उपाय लोक शोधतील. त्यासाठी डॉक्टरांचे उंबरे झिजवतील. हातांमध्ये बायोनिक रोपण करून मशीनपेक्षाही अिधक वेगाने काम करण्याचे तंत्र माणूस शोधून काढेल. या येत्या चार दशकात जो माणूस क्षमता वाढवण्यासाठी शारीरिक जोखीम पत्करण्यास तयार असेल तोच तग धरू शकेल.