नवी दिल्ली - भारतातील गरिबीचे प्रमाण घटले आहे; परंतु दोन वेळचे जेवण मिळण्याची भ्रांत मात्र अजूनही कायम आहे. भुकेची समस्या देशात गंभीर असून भारत जागतिक पातळीवर नेपाळ आणि श्रीलंकेच्याही पिछाडीवर आहे.
गेल्या वर्षी भारत ७ देशांच्या यादीत ६३ व्या स्थानी होता; परंतु २०१४ मध्ये देशाची आणखीनच घसरण झाली आहे. ५५ व्या स्थानी पोहोचला आहे. कुपोषणाच्या पातळीवर मात्र आशादायी बदल झाला आहे. आठ गुणांनी त्यात सुधारणा झाली आहे. तुलनेने पाकिस्तान आणि बांगलादेशपेक्षा भारत पुढे आहे. अहवालानुसार पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमधील वजनाची समस्या सोडवण्यात एक वर्षात चांगले यश आल्याचे अहवालात म्हटले आहे. परंतु त्यातही करण्यासारखे खूप काही आहे. त्यातून मोठ्या लोकसंख्येला पोषण आहाराची सुरक्षा प्रदान करण्याचा हेतू आहे.
नेपाळ, श्रीलंकेची सुधारणा
कुपोषण आणि भूकबळीच्या समस्येत शेजारील नेपाळ आणि श्रीलंकेने सुधारणा केली आहे. नेपाळ ४४, तर श्रीलंका ३९ व्या स्थानी आहे.
‘गंभीर’ पण ‘भयंकर’ नव्हे
भारतातील भूकबळी किंवा कुपोषणाची समस्या जागतिक पातळीवर ‘गंभीर’ वर्गात नमूद करण्यात आली आहे. त्याची नोंद ‘भयंकर’ या वर्गवारीत झालेली नाही. त्यामुळे सुधारणेला वाव असल्याचे दिसून येते.