आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इराकचे अस्तित्व धोक्यात, पाहूयात कोणकोणत्या देशात सुरू आहे गृहयुध्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(इस्लामिक स्टेट ऑफ सीरिया अ‍ॅण्ड अल-शामच्या दहशतवाद्यांचे संग्रहीत छायाचित्र)

आंतरराष्ट्रीय डेस्क - इराकमधील परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत आहे. बगदादजवळील उत्तरी भागात इस्लामिक स्टेट ऑफ सीरिया अ‍ॅण्ड अल-शाम (आईएसआईएस) आणि इराकी सैन्यादरम्यान भीषण गृहयुध्द सुरू आहे. यामुळे संयुक्त राष्ट्राने हे गृहयुध्द इराकच्या अस्तित्वासाठी धोकादायक असल्याचे सांगितले आहे.
मात्र अशी परिस्थिती केवळ इराकमध्येच नाही तर, जगामध्ये इराकप्रमाणेच अनेक देशांमध्ये इराकप्रमाणेच गृहयुध्द सुरू झाले आहे. ज्याची भरपाई सामान्य नागरिकांना करावी लागली आहे.

गृहयुद्धच्या झळा सोसत असणारे देश
1. इराक
2. सीरिया
3. सोमालिया
4. दक्षिण सूदान
5. नायजेरिया
(पुढील स्लाईडमध्ये वाचा, या देशांमध्ये कसे सुरू झाले गृहयुध्द, काय आहे सद्य परिस्थिती)

जगातील आठ टक्के लोकसंख्या सध्या अशा विपरित परिस्थितीत राहत आहे

इंस्टीट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पीसने प्रकाशित केलेल्या ग्लोबस पीस इंडेक्स (जीपीआय-2014) च्या अहवालानुसार, जगातील 8 टक्के लोकसंख्या अशा देशांत राहत आहे ज्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. या अहवालानुसार या देशांमध्ये राहणार्‍या लोकांची परिस्थिती नर्कामध्ये राहण्यासारखीच आहे.

सर्वात अशांत देश
ग्लोबल पीस इंडेक्स (जीपीआय-2014)नुसार 162 देशांच्या या यादीत दक्षिण सूदान (160), अफगाणिस्तान (161) आणि सीरिया (162) हे देश अशांत देशांमध्ये सर्वात वर आहेत, तर या यादीत भारताचा क्रमांक 143 वा आहे.
हिंसाचाराचा प्रभाव
जागतीक स्तरावर वाढत असलेल्या दहशतवादी कारवायांचा अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम पडतो. जीपीआईच्या अहवालानुसार 2012 मध्ये हिंसाचारामुळे 9.46 ट्रिलियन डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये जवळपास 570111.6 अरब रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. हे नुकसान जीडीपीच्या 11.3 टक्क्यांएवढे आहे, जे आफ्रीकी महादेशांच्या संयुक्त जीडीपीच्या दुप्पट आहे.

हे आहेत शांततापूर्ण देश
जगातील शांततापूर्ण देशांचा जर विचार केला तर, त्यामध्ये आईसलॅंड, डेनमार्क आणि ऑस्ट्रीया यांची नावे सर्वात वर आहेत.
दक्षिण आशियामध्ये भूटान सर्वात शांत देश
दक्षिण आशियामध्ये भूटान सर्वात शांत देश आहे. त्यानतंर नेपाळ, बांग्लादेश आणि श्रीलंकेचा क्रमांक लागतो. भारत यांमध्ये पाचव्या स्थानावर आहे. तर पाकिस्तानला सहावा आणि अफगाणिस्तानला सातवा क्रमांक देण्यात आला आहे. तर जागतिक स्तरावर पाकिस्तान 154 व्या क्रमांकावर आहे.

पुढील स्लाईडमध्ये वाचा... इराक, सिरिया, सोमालिया, दक्षिण सुदान आणि नायजेरियामध्ये चालू असलेल्या संघर्षाचे संक्षिप्त माहिती...