गाझापासून
इराकपर्यंत, आफ्रिका असो युक्रेन प्रत्येक ठिकाणी युध्दजन्य परिस्थिती आहे. असे वाटते की, संपूर्ण जगाचे युध्द भूमीत रूपांतर झाले आहे. जगात केवळ 11 देश असे आहेत जे आंतरराष्ट्रीय वाद आणि हिंसेपासून दूर आहेत, असे जागतिक शांतता निर्देशांकाच्या ( ग्लोबल पीस इंडेक्स) अहवालात सांगण्यात आले आहे. यात आयसलँड, डेन्मार्क, ऑस्ट्रिया, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, फिनलंड, कॅनडा, बेल्जियम, नॉर्वे आणि झेक गणराज्य या देशांचा समावेश आहे. या देशांमध्ये देशांतर्गत आणि सामाजिक संघर्ष किमान पातळीवर आहे. अहवालात सीरिया सर्वात धोकादायक देश ठरला आहे.
येथे नरकाप्रमाणे जीवन
जगातील 8 टक्के लोकसंख्या सर्वात अशांत 11 देशांमध्ये राहते. त्यांचे जीवन नरकापेक्षा कमी नाही, असे इन्स्टीट्यूट फॉर इकोनॉमिक्स अँड पीसने प्रकाशित केलेल्या ग्लोबल पीस इंडेक्सच्या ( जीपीआय-2014) अहवालात म्हटले आहे. जीपीआयनुसार 162 देशांच्या यादीत दक्षिण सुदान ( 160), अफगाणिस्तान ( 161) आणि सीरिया(162) हे तीन देश सर्वात अशांत देश आहेत. भारताचा या यादीत 143 व्या क्रमांकावर आहे.
ही आहेत निकष
हा निर्देशांक 22 निकषांचा आधार घेऊन तयार करण्यात आला आहे. एका देशाचे
आपल्या शेजारीला राष्ट्राबरोबर असलेले संबंध, संरक्षण खर्च आणि तुरुंगातील कैदी हे निकष होते. 22 निकषांचे एकूण तीन प्रमुख भागांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे....
1. गृहयुध्द आणि आंतरराष्ट्रीय वाद
2. सामाजिक सुरक्षितता आणि संरक्षण
3. लष्करीकरण
चला जाणून घ्या जगातील 11 सर्वात शांत देशांविषयी ....
आयसलँड
ग्लोबल पीस इंडेक्स 2014 नुसार शांत देशांच्या यादीत आयसलँड पहिल्या क्रमांकावर आहे. गृह आणि आंतरराष्ट्रीय वाद यांचे प्रमाण नगण्य आहे. हा देश आपल्या सौंदर्यासाठी प्रसिध्द आहे. मोठे हिमकडे आणि ज्वालामुख पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक येथे येतात. कधीच वादाबाबतची बातमी आंतरराष्ट्रीय स्तरावर आलेली नाही. राजधानी रिकविक अप्रतिम निसर्ग आणि सांस्कृतिक आकर्षणासाठी जगात प्रसिध्द आहे.
पुढे वाचा, इतर 10 देशांविषयी..