आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ई-मेलला सुरक्षित बनवण्यासाठी नवीन उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एडवर्ड स्नोडनच्या खळबळजनक खुलाशानंतर ई-मेलची प्रायव्हसी टिकवून ठेवण्याचे उपाय सुरू झाले आहेत. गुगलचे जीमेल, मायक्रोसॉफ्टचे आउटलूक.कॉम आणि याहू मेलने आपली सेवा सरकार वा एखाद्या इतर व्यक्तीला वाचवण्यासाठी इन्स्क्रिप्शनचा जास्त वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. इन्स्क्रिप्शनने ई-मेलची सुरक्षितता खूपच वाढते. इन्स्क्रिप्शन मेसेजला इनकड करण्याची प्रक्रिया आहे. जर तुमचा मेसेज कुणाच्या हाती लागला, तरी इन्स्क्रिप्शन उघडण्याची चावी (डिस्क्रिप्शन) शिवाय तो वाचला जाऊ शकत नाही.गुगलने आपले 100 टक्के मेसेज इन्स्क्रिप्ट करण्याची सुरुवात केली आहे. कंपनीने आपल्या डेटा सेंटरचे सर्व यंत्रात येणारे-जाणारे ई-मेल इन्स्क्रिप्ट केले आहेत. मायक्रोसॉफ्ट व याहूही लवकरच असे करणार आहे.