आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्‍यासारख्‍या माणसांसाठी सोन्याची बार्इक, किमत फक्‍त 5.53 कोटी रूपये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैमबर्ग- ही आहे 'हार्ले डेविडस' या कंपनीची नवीन बाईक. डेनमार्कच्‍या मोटारसायकल निर्माण करणा-या लॉज जेनसन या कंपनीने ही बाईक तयार केली आहे. जर्मनीच्‍या हैम्‍बर्ग शहरामध्‍ये चालू असलेल्‍या 'मोटरसायकल' एक्‍सपोमध्‍ये शुक्रवारी ही सोन्‍याची बाईक लॉंच करण्‍यात आली. या बाईकला सोन्‍याचा मुलामा देण्‍यात आलेला आहे, ही बाईक जगातील सर्वात महागडी ठरली आहे. ही बाईक घ्‍यायची असले तर चक्क 5.53 कोटी रूपये माजावे लागतात.
हार्लेची सर्वात स्‍वस्‍त बाईक याच महिन्‍यामध्‍ये दिल्‍ली ऑटो एक्‍सपोच्‍या प्रदर्शनामध्‍ये लॉंच करण्‍यात आली. 750 सीसीच्‍या हार्ले- डेविडसन स्‍ट्रीट 750 या गाडीची किमत चार लाख दहा हजार रूपये आहे. हौशी ग्राहकांसाठी सर्वात महागडी बाईक तयार करणारी कंपनी म्‍हणून हार्ले कंपनी ओळखली जाते.
पुढील स्‍लाईडवर पाहा सोन्‍याच्‍या बाईकचे छायाचित्र