आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुनामीग्रस्तांना छप्पर फाडके सोन्याची भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो - सुनामीत उदध्वस्त झालेल्या जपानमधील छोट्याशा बंदरावरील मच्छिमारांना आजकाल सोन्याच्या विटांची भेट मिळत आहे. सोन्याच्या या विटा एका अनामिक दानशूराकडून मिळत आहेत.

सुमानीचा फटका बसलेल्या मियागी प्रांतामधील इशिनोमिकी बंदरावर गेल्या दहा दिवसांपासून एका अनामिक व्यक्तीने पार्सल पाठवण्यास सुरुवात केली.या पार्सलमध्ये दोन किलोच्या सोन्याच्या विटा होत्या. सुनामीग्रस्तांना मदत करणा-या संस्था आणि मच्छीबाजारात काम करणा-या लोकांना या सोन्याच्या विटा मिळाल्या असून बाजारात त्याची किंमत सुमारे 1 कोटी 35 लाख रुपये (2लाख 50 हजार डॉलर्स ) आहे.एका स्थानिक दैनिकाने या घटनेचे ‘सोन्याची सद्भावना’असे वर्णन केले आहे.

11 मार्च 2011 रोजी झालेला 9 तीव्रतेचा भूकंप आणि त्यानंतर उसळलेल्या सुनामी लाटांनी सुमारे 19 हजार बळी घेतले होते.या सुनामीच्या प्रकोपात फुकूशिमा अणुप्रकल्पालाही धक्का बसून किरणोत्सर्गाचा फै लाव झाला होता. इशिनोमिकी हे शहर टोकियोच्या ईशान्येकडील भागात 350 कि.मी.अंतरावर आहे.सुनामीच्या तडाख्यात या ठिकाणी 3 हजार बळी गेले होते, तर 40 हजारांपेक्षा अधिक इमारती भुईसपाट झाल्या होत्या. इशिनोमिकी बंदर आणि मच्छिबाजाराला संचालन करणा-या कंपनीच्या प्रमुखानेही दोन किलो सोन्याच्या विटांचे पार्सल मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे, असे बीबीसीच्या वृत्तात म्हटले आहे. इशिनोमिकी मच्छिबाजार कंपनीचे प्रमुख क्युनिओ सुनो यांनी ‘एएफपी’वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार या पार्सलवर विविध मालांचे चिन्ह होती.त्यामुळे ते खूपच काळजीपूर्वक उघडले होते.अशाच तहेचे पार्सल योशी कनिको या स्वयंसेवी संस्थेलाही मिळाले आहे. त्यातही सोन्याच्या दोन विटा होत्या.

पार्सल उघडताच थक्क
पार्सल उघडताच थक्क झालो. यामध्ये कागदात गुंडाळलेल्या 24 कॅरेटच्या दोन सोन्याच्या विटा होत्या.त्यावर कोणताही संदेश अथवा पत्ताही नव्हता.हे पार्सल वायव्य भागातील नागनो शहरातून आल्याचे सांगण्यात आले असे क्युनिओ सुनो यांनी सांगितले.