आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनेरी पंखांची सोनेरी कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर्मनीतील ‘फ्लुगेलआतो’ अर्थात पंखांची कार गुरुवारी कलोन शहरातील म्युझियमवर अलगद विराजमान झाली. कलोन कॅथेड्रल चर्चच्या इमारतीसमोर क्रेनच्या साहाय्याने ही कार म्युझियमच्या छतावर हळूच ठेवण्यात आली.

वैशिष्ट्ये : जर्मनीचे कलाकार एच.ए.शुल्ट यांनी सन 1991 मध्ये पक्ष्याची प्रतिकृती असलेली सोनेरी पंखांची कार तयार केली होती. कलोन संग्रहालयाची वास्तू जतन करण्याच्या दृष्टीने ही कार काढून टाकण्याची मागणी जिल्हा अध्यक्ष फ्रान्झ अँटवर्प यांनी केली होती, परंतु पुरातत्त्व मंत्रालयाने ही मागणी फेटाळली होती. सन 1989 चे फोर्ड फिएस्टाचे हे मॉडेल आहे. ही कार फोर्र्डच्या कलोन येथील कारखान्यात नूतनीकरण करण्यासाठी नेण्यात आली होती. तेथील प्रशिक्षणार्थी कर्मचार्‍यांनी तिचे नूतनीकरण केले.