आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉर्ज क्लुनी व मेरिल स्ट्रीप यांना गोल्डन ग्लोब

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजलिस - ऑस्कर पुरस्काराच्या अगोदर सर्वाधिक चर्चित व प्रतिष्ठित मानल्या जाणा-या गोल्डन ग्लोब पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून जॉर्ज क्लुनी, तर अभिनेत्री म्हणून मेरिल स्ट्रीपला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लॉस एंजलिस येथे झालेल्या या रंगारंग पुरस्कार वितरण सोहळ्यात हॉलीवूडच्या अवघ्या स्टार्सनी हजेरी लावली होती. ‘दी डिसेंडेट्स’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट म्हणून पुरस्कार देण्यात आला. मार्टिन स्कोरसेजी यांना ‘ह्युगो’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले. नाट्य चित्रपट प्रकारात मेरिल स्ट्रीपने बाजी मारली. ती सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. जॉर्ज क्लुनीच्या ‘दी डिसेंडेट्स’ या चित्रपटातील कामासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरव करण्यात आला. सांगीतिक तथा विनोद विभागात ‘दी आर्टिस्ट’ या चित्रपटाची निवड झाली. जॉन इयुजाँडा याला सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून सन्मान करण्यात आला तर याच विभागात मिशेल विल्यिम्सला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सह अभिनेत्रीचा पुरस्कार ऑक्टेव्हिया स्पेन्सर, तर सह अभिनेत्याचा पुरस्कार ख्रिस्तोफर पल्मल, वुडी अ‍ॅलनने सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळवला. वुडीचे ‘मिडनाइट इन पॅरिस’साठी कौतुक झाले. छोट्या पडद्यासाठी देण्यात येणा-या विभागात केट विन्सलेटला पुरस्कार मिळाला. विदेशी गटात इराणच्या ‘दी सेपरेशन’ या चित्रपटाची निवड झाली आहे. ‘अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ टिनटिन’ या अ‍ॅनिमेटेडला फीचर फिल्म गटात सर्वश्रेष्ठ म्हणून निवडले गेले.