आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Good US India Relations Don't Threaten China: Barack Obama

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत-अमेरिका संबंधावर चीनने काळजी करू नये - बराक ओबामा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - भारत आणि अमेरिकेच्या वाढत्या जवळीकतेबाबत चीनकडून व्यक्त होणारी चिंता अमेरिकेने अनावश्यक ठरवली आहे. उभय देशांना एकत्र आणणारे अनेक मुद्दे आहेत, मात्र त्यावरून चीनला कोणताही धोका नाही, असे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी स्पष्ट केले आहे.

भारतीय वंशाचे अमेरिकी पत्रकार फरिद झकेरिया यांना दिलेल्या मुलाखतीत ओबामा म्हणाले, अमेरिका भारताच्या निकट पोहोचू शकणारे असे अनेक विषय आहेत. विशेष करून लोकशाहीबाबत म्हणता येईल. भारत आणि अमेरिकेतील काही मूल्ये व आशा-आकांक्षा समान आहेत. मात्र, चीनबाबत तसे नाही. याच कारणामुळे मला इथे आपलेपणा वाटतो. अमेरिकी नागरिकांचीही अशीच धारणा आहे. ओबामा यांनी दिल्ली प्रवासादरम्यान झकेरिया यांना ही मुलाखत दिली होती. ही मुलाखत रविवारी सीएनएनच्या फरिद झकेरिया जीपीएस कार्यक्रमामध्ये प्रसारित झाली. तुम्हाला सर्वाधिक अभिमान कशाचा वाटतो? या प्रश्नावर ओबामा म्हणाले, इराक आणि अफगाणिस्तानमधील दोन युद्धे जबाबदारीने पूर्ण केली याचा सर्वाधिक अभिमान आहे. भारतासारख्या देशाशी बळकट संबंध प्रस्थापित करत अमेरिकी मूल्ये दाखवली.

भारताच्या संबंधावर समृद्धी : भारतात प्रचंड क्षमता आहे. भारतीय समाज आपल्यासारखाच मूल्याधिष्ठित आहे. १.२ अब्ज महत्त्वाकांक्षी भारतीयांशी आपले संबंध कसे आहेत यावर भविष्यातील आपली समृद्धी आणि सुरक्षा अवलंबून आहे. चीनसंदर्भात ओबामा म्हणाले, माझ्या दृष्टीने भारत-अमेरिका संबंध महत्त्वाचे आहेत. काही दिवसांपूर्वी मी चीन दौर्‍यावर होतो तेव्हा राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत सखोल चर्चा झाली होती.

दुसर्‍यांच्या नुकसानीतून चीनने विकास साधू नये सध्याच्या काळात सर्व देशांना हितावह ठरणारी व संयुक्त मानकाने एकत्र आणणारी व्यवस्था निर्माण केली पाहिजे. समृद्ध अमेरिका करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. यासाठी एकत्र काम करण्याची आमची इच्छा आहे. पंतप्रधान मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेचा केंद्रबिंदू तोच होता. चीनच्या शांततापूर्ण विकासात अमेरिकेचे हित आहे. चीन प्रगती करत आहे, ही आमच्यासाठी चांगली बाब आहे. मात्र, त्याचबरोबर चीनने दुसर्‍यांचे नुकसान करून विकास साधू नये.