आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आत्मघाती स्फोटात नायजेरियन राष्ट्रपती बचावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोम्बे - नायजेरियाचे राष्ट्रपती गुडलक जोनाथन मंगळवारी आत्मघाती हल्ल्यातून बालंबाल बचावले. नायजेरियाच्या गोम्बे शहरामध्ये हा स्फोट झाला. राष्ट्रपती निवडणूक सभा आटोपून स्टेडियममधून बाहेर पडत होते, तितक्यात कारजवळ कमरेला स्फोटके बांधलेल्या महिलेने स्वत:ला उडवले. यामध्ये हल्लेखोर आणि एक व्यक्ती ठार तर १८ जण जखमी झाले. याव्यतिरिक्त नायजेरियाच्या तीन शहरांतील न्यायालय परिसरात बॉम्बस्फोट झाले. स्फोटाची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारली नाही. मात्र, यामागे बोको हरामचा हात असण्याचे मानले जाते. त्यांनी गोम्बे शहरावर याआधीही हल्ले केलेले आहेत. समन्वय साधून हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन दिवसाआधी एका मशिदीबाहेर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला होता.

निवडणूक १४ फेब्रुवारी रोजी : नायजेरियामध्ये १४ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे. राष्ट्रपती गुडलक जोनाथन सत्तारुढ पिपुल्स डेमोक्रॅटिकच पार्टीच्या तिकिटावर पुन्हा मैदानात आहेत. त्यांना माजी लष्करी शासक मुहम्मद बुहारी यांचे आव्हान आहे. १९९९मध्ये राजवट संपुष्टात आली.