आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगलकडून जाहिरातीत तुमचे नाव-फोटोचा वापर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गुगलला आपल्या जाहिरातीमध्ये युजर्सचे नाव आणि फोटो वापरण्याची इच्छा आहे. त्यासाठी युजर्सची परवानगी मागितली जात आहे. इंटरनेट सर्च इंजिन 11 नोव्हेंबरपासून आपल्या नियम आणि अटी बदलणार आहे.
कंपनीने या फीचरला शेअर एन्डॉर्समेंट असे नाव दिले आहे.

त्यात गुगल प्ले यावर आपल्याकडून खरेदी करण्यात आलेल्या वस्तू, गाणे, रेस्तराँ, दुकाने व इतर वस्तूंसंबंधीची माहिती जाहिरातीमधून देण्याची कंपनीची योजना आहे. गुगलवर सर्च करताना अशा जाहिरातीमधील तुमचे मित्र संपर्कातील लोकांना दिसू लागतील. युजरला जर आपल्या संपर्काचा तपशील गोपनीय ठेवायचा असेल, तर त्याचाही पर्याय युजरला उपलब्ध करून देण्यात आला आहे. सोशल नेटवर्क गुगल प्लसवर वापरण्यात येणारे फोटो व नाव जाहिरातीमध्येदेखील पाहायला मिळतील. दर महिन्याला गुगल सोशल नेटवर्कचे 39 कोटी सक्रिय युजर्स आहेत.