लंडन -
गुगलची
तांत्रिक संशोधन शाखा ‘गुगल एक्स’ने स्वंयचलित मालवाहू विमान वकिसति केले आहे. हे स्वंयचलित विमान अर्थात ड्रोनवर सध्या काम सुरू असून याची चाचणी नुकतीच घेण्यात आली. २ वर्षांपासून यावर संशोधन सुरू होते.
आपत्तीग्रस्त भागाला मदत पोहोचवण्यासाठी या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले होते, असे गुगलच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले.
असे विमान आपत्तीग्रस्त प्रदेशाला सातत्याने सेवा देण्यात यशस्वी झाले, तर त्यांच्या उत्पादनाचा निर्णय घेता येईल. मात्र हे प्रत्येक विमान सतत सक्षमतेने काम करणे आवश्यक असल्याचे गुगल एक्सचे अॅस्ट्रो टेलर यांनी सांगतिले. वारंवार यांचा उपयोग केल्यास आपत्ती निवारणास मोठा हातभार लागेल. अशा मालवाहू ड्रोनच्या वायू वाहतुकीविषयी अद्याप अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या वायू वाहतुकीच्या नियमांविषयी संबंधति कंपन्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. त्यामुळे तांति्रक पातळीवर मालवाहू ड्रोन्स उपयुक्त असले तरीही या वाहतुकीच्या नियमांची कोणतीही योजना अद्याप समोर आली नाही.