आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुगल अर्थने टिपली एलियन्सची छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - गुगल अर्थने कथित एलियन्सची छायाचित्रे टिपली आहेत. या छायाचित्रांमध्ये यूएफओ विमानातून एक एलियन्स डोके बाहेर काढून काही तरी पाहताना दिसत आहे. याबाबतचा एक व्हिडिओही यूट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. त्यामध्ये नारंगी रंगाची यानाच्या आकाराची एक वस्तू अमेरिकेच्या मोंटानाच्या टाऊन क्रीकच्या आकाशात घिरट्या घालत आहे. त्यात
दुसर्‍या ग्रहावरील अंतराळवीरही दिसत आहे.
अमेरिकेच्या मोंटानामध्ये उडत होते नारंगी रंगाचे यूएफओ, विमानातून वाकून पाहत होता एलियन्स
एलियन्सचे डोके दिसले
गुगल अर्थच्या छायाचित्रामध्ये यूएफओमधून डोकावणाºया एलियन्सचे डोके दिसणे म्हणजे सर्व यूएफओ विमाने एलियन्सची ड्रोन असत नाहीत, तर काही एलियन्सद्वारा नियंत्रित केले जाणारे यूएफओही असतात, असा याचा अर्थ काढण्यात आला आहे.
आश्चर्याचा धक्का
सहा मिनिटे 11 सेकंदांचा हा व्हिडिओ युफोलॉजी वेबसाइटचे स्कॉट वॉरिंग यांनी अपलोड केला आहे. या व्हिडिओत वॉरिंग यांचा एक संदेशही आहे. ही वस्तुस्थिती आहे. या छायाचित्रांमध्ये आपणाला एलियन्सचा स्पष्टच पुरावाच मिळाला आहे, त्यामुळे मी आश्चर्यचकित झालो आहे, असे स्कॉट वॉरिंग यांनी म्हटले आहे.

गुगल व्हॉइस सर्चवर भारतीय लहेजा
नवी दिल्ली- गुगल व्हॉइस सर्चमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे ही सेवा आता भारतीय भाषेच्या लहेजावरही काम करू शकणार आहे, मात्र सर्चसाठी युजर्सना इंग्रजी भाषेचाच वापर करावा लागेल. गुगलने 700 भारतीय स्वयंसेवकांच्या मदतीने भारतीय ढंगात बोलल्या जाणाºया इंग्रजी भाषेचा डेटाबेस सर्चमध्ये समाविष्ट केला आहे. गुगल व्हॉइस सर्च अँड्रॉइड 2.3 ओएस आणि त्यानंतरच्या ओएसवर काम करते. आयफोन, आयपॅड आणि पीसीसाठी व्हॉइस सर्च क्रोम ब्राऊसरवर काम करते.