आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगल ग्लासद्वारे बेसावध चोराच्या हालचाली पाहता येतात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्कमध्ये भटकत असलेल्या एका पर्यटकाचा गुगल ग्लास चोरीस गेला. परंतु तो सामान्य चष्मा नसून चोराला कोणतीही जाणीव नसताना लोक मात्र त्याच्या हालचाली पाहत होते. ही घटना माइक गेलरच्या बाबतीत घडली. ते गुगल ग्लास वापरत होते. यादरम्यान एक अनोळखी माणूस आला. त्याने ग्लास पाहू शकतो का, याची चौकशी केली.
गेलरने त्याच्याकडे ग्लास सोपवला. त्यानंतर तो माणूस पळून गेला. परंतु ही घटना त्या चष्म्यावर असलेल्या कॅमेर्‍यात बंदिस्त होत होती. कारण त्याचा कॅमेरा चालू होता. गेलरकडे त्या ग्लासशी संबंधित एक अँप होते. त्यामुळे त्याने त्या चोराची तक्रार पोलिसांकडे दिली. परंतु ते उपकरण त्यांना मिळू शकले नाही.

*gscomputing.com