आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Google Internet News In Marathi, Shark Fish, Divya Marathi

गुगल इंटरनेट केबलवर शार्कचा हल्ला, बचावासाठी नव्या प्रकल्पावर काम चालू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - सर्च इंजिन गुगलचे इंटरनेट केबल सध्या शार्क माशांचे लक्ष्य ठरत आहे. शार्कपासून केबलचा बचाव करण्यासाठी गुगल सध्या नव्या प्रकल्पावर काम करत आहे. गुगलचे प्रकल्प व्यवस्थापक डेन बेल्चर यांनी ही माहिती दिली.

समुद्रात 80 च्या दशकापासून टाकलेल्या केबल्सवर सध्या शार्क मासे हल्ला करत आहेत. 1987 मध्येही न्यूयॉर्क टाइम्सने यासंबंधी वृत्त दिले होते. अमेरिका, युरोप आणि जपानला जोडणा-या केबल्सला शार्क चावत असल्याची माहिती त्यात दिली होती. 1985 मध्ये कॅनरी आयलँड परिसरातील समुद्रात एका केबलवर शार्कचे दातही आढळून आले होते.

केबल वाचवणार कसे?
पॅसिफिक सागरातील केबलला बुलेटप्रूफ जॅकेट आणि अंतराळात वापरल्या जाणा-या केवलार या मटेरियलपासून कोटिंग केली जाईल. या कोटिंगला पॉलिइथायलिन प्रोटेक्टिव्ह यार्न असे म्हणतात.

केबल कुरतडण्यामागील कारण
> हे केबल म्हणजे लहान मासे असल्याचा शार्कचा समज होतो. त्यामुळे ते केबलला दाताने चावण्याचा प्रयत्न करतात.
> केबलमधील विद्युत-चुंबकीय किरणांमुळे शार्क त्यांच्याकडे आकर्षित होतात.
> सर्वाधिक हल्ले ऑप्टिक फायबरवर होतात. 96,560 किलोमीटरची ही तांब्याची वायर असल्यामुळे सहजासहजी कुरतडता येत नाही.

हल्ला रोखणा-या सॉफ्टवेअरची निर्मिती
सायबर जगतासाठी खूशखबर आहे. जर्मनीच्या संशोधकांनी एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. त्याच्या साह्याने सायबर हल्ला रोखता येऊ शकेल. हॅसिएन्डा असे सॉफ्टवेअरचे नाव आहे. सोफ्टवेअरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे सॉफ्टवेअर जगभरातील अनेक सर्व्हरला ओळखू शकते. त्याचबरोबर काही वेळातच धोक्याची जागा शोधून काढण्याची क्षमता या प्रणालीमध्ये समाविष्ट असल्याचा दावा जर्मनीतील तंत्रज्ञान विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे.