आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगलची मोठी ऑफर व्हॉट्सअ‍ॅपने फेटाळली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप यांच्यात करार व्हावा, असे गुगलला वाटत नव्हते. त्यासाठी गुगलचे सीईओ लॅरी पेज यांनी कूम यांची भेट घेऊन त्यांना 1.18 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. ही रक्कम झालेल्या सौद्यापेक्षा अधिक आहे. परंतु त्यांचा प्रस्ताव व्हॉट्सअ‍ॅपने फेटाळल्याचे उजेडात आले आहे.
द इन्फर्मेशन वेबसाइटने यासंबंधीचा अहवाल जारी केला आहे. तीन सूत्रांचा हवाला दिला आहे. लॅरी पेजला या गोष्टीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ व्हॉट्सअ‍ॅपच्या मालकांची भेट घेतली. त्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपला मोठी रक्कम देण्याचाही प्रयत्न केला. व्हॉट्सअ‍ॅपने त्यांचा प्रस्ताव नाकारला. परंतु हा करार फिसकटण्यामागे वेगळेच कारण सांगितले जाते. फेसबुकपेक्षा अधिक रक्कम देऊ करणाºया गुगलने व्हॉट्सअ‍ॅपच्या संचालकांना आपल्या मंडळावर घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे हा प्रस्ताव नाकारण्यात आला. वास्तविक फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप या दोन्हींचा उद्देश अधिकाधिक लोकांना जोडणे असाच आहे.