आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Google Taking Initiative For Digital Will To Protect Private Data

डिजिटल मृत्युपत्र लिहा, ऑनलाइन डाटाबाबत निश्चिंत व्हा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ह्यूस्टन - तुमचा मृत्यू झाल्यानंतर तुम्ही साठवून ठेवलेले अत्यंत खासगी स्वरूपाचे मेल अथवा संभाषण मृत्यूनंतर कोण वाचणार याची काळजी तुम्हाला सतावतेय का? काळजी करू नका. लवकरच तुम्हाला मदत मिळणार आहे. गुगलने त्यावर मार्ग शोधून काढला आहे.

गुगल निष्क्रिय खात्यांसाठी इनअ‍ॅक्टिव्ह अकाउंट मॅनेजर लाँच करत असून त्याचा ‘डिजिटल विल’ म्हणून वापर करता येणार आहे. मृत्यूनंतर किंवा अकार्यक्षम झाल्यानंतर तुमचे डिजिटल फोटो, डॉक्युमेंट्स आणि अन्य व्हर्च्युअल बाबींचे काय करण्याची इच्छा आहे, अशी विचारणा गुगल आता लोकांकडे करू लागले आहे. गुगल ड्राइव्ह, जीमेल, यूट्यूब आणि गुगल प्लसवरील डाटा कुणाकडे हस्तांतरित करायचा किंवा डिलीट करून टाकायचा, याबाबतचे निर्देश इनअ‍ॅक्टिव्ह अकाउंट मॅनेजर गुगलला देणार आहे. गुगलच्या अकाउंट पेजवर तुमचा डाटा विश्वासू मित्र, कुटुंबातील सदस्य किंवा अन्य कोणाशी शेअर करायचा किंवा डिलीट करून टाकायचा याबाबतचा पर्याय देण्यात आला आहे. किती दिवस प्रतीक्षा करायची आणि किती दिवसांनंतर कारवाई करायची, याबाबतचे आॅप्शनही देण्यात आले आहेत. ‘टाइमआऊट’कालावधीबाबतचे स्मरण ई-मेल किंवा टेक्स्ट मेसेजद्वारे पाठवण्यात येणार आहे.

काय आहे प्रक्रिया?
गुगल इनअ‍ॅक्टिव्ह मॅनेजर अ‍ॅक्टिव्हेट केल्यानंतर किती दिवसांनंतर अकाउंट इनअ‍ॅक्टिव्ह करायचे याचा तपशील युजर्सना द्यायचा आहे. त्या ठरावीक कालावधीनंतर तुमच्या अत्यंत विश्वासातील दहा लोकांना पुढील प्रक्रिया पूर्ण कशी करायची याबाबतचा ई-मेल पाठवण्यात येईल. त्यानंतर गुगल सर्व सामग्रीसह प्रभावीपणे तुमचे अकाउंट प्रभावीपणे ‘बर्न’ करण्याचा पर्याय युजर्सना देईल. युजर्सना 3,6,9 किंवा 12 महिन्यांच्या टाइमआऊट कालावधीचा पर्याय उपलब्ध आहे. हा कालावधी संपण्याच्या एक महिना अगोदर सेकंडरी ई-मेल आयडीवर मेल पाठवून तशी सूचना देण्यात येईल. हा कालावधी संपल्यानंतर तुमच्या विश्वासातील व्यक्तीला ई-मेल पाठवून डाटा कसा डाऊनलोड करायचा याच्या सूचना देण्यात येतील.


सेट-अप पेजवर काय?
तुम्ही तुमच्या अकाउंटचा वापर बंद केल्यानंतर तुमचे ई-मेल्स, डॉक्युमेंट्स, फोटोचे काय होईल? गुगल गुगल तुम्हाला नियंत्रणात ठेवेल. तुम्हाला तुमचा डाटा विश्वासू मित्र, कुटुंबातील सदस्यांशी शेअर करायचा असेल किंवा सर्व डाटासह तुम्हाला तुमचे अकाउंटच डिलीट करून टाकायचे असेल. तुमच्या डाटाचे काय करायचे यासाठी आम्ही तुम्हाला अनेक पर्याय देतो. इनअ‍ॅक्टिव्ह अकाउंट मॅनेजर वापरून तुम्हाला तुमचे खाते निष्क्रिय झाल्यानंतर डाटाचे काय करायचे किंवा कोणाकडे हस्तांतरित करायचा याचा निर्णय घेता येईल.