आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पापणी हलवा अन् पैसे पाठवा, माहिती तंत्रज्ञानातील नवी क्रांती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - स्मार्टफोन, टॅब्लेटच्या जमान्यात पैसे पाठवण्यासाठी पोस्टाची मनिऑर्डर हा प्रकार हळूहळू मागे पडतोय. आता येत्या काही दिवसांत स्मार्टफोन, टॅब्लेटवरही तीच वेळ येणार आहे. गुगल कंपनी लवकरच एक नवे अँप आपल्या गुगल चष्म्यासाठी (गुगल ग्लास) विकसित करीत आहे. या वॉलेट अँपमुळे केवळ पापणी मिटण्याच्या आत आपले नातेवाईक, मित्रांना पैसे पाठवणे शक्य होणार आहे. हाताच्या हालचाली अथवा बोलून आपण हे पैसे पाठवू शकतो.
माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गुगल ग्लास ही क्रांतीच समजली जाते. केवळ डोळ्यांच्या हालचालींवर या ग्लासद्वारे कार नियंत्रण करणेही शक्य झाले आहे. आता त्यात ही भर पडणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर सध्या या वॉलेट अँपचा कंपनी वापर करीत आहे. केवळ ‘सेंड मनी’ (पैसे पाठव) असे शब्द उच्चारताच आपल्याला मोबाइलवर पैसे पाठवणे शक्य होईल. अर्थात वॉलेट पेमेंटसाठी तुम्ही जे अकाउंट वापरता तेच अकाउंट गुगल ग्लाससाठीही वापरावे लागणार आहे.
गुगल ग्लासच्या वॉलेट अँपच्या सुविधेसाठी आपल्याला पैसे मोजावे लागणार आहेत. एका व्यवहारासाठी आपल्याला 2.9 टक्के शुल्क चुकते करावे लागेल. गुगलच्या वॉलेट अँपमध्ये आताही विविध सुविधा आहेत. त्यामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी कंपनी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न करीत आहे.

वर्षअखेरीस बाजारात
गुगलचा बहुप्रतीक्षित गॉगल चालू वर्षअखेरीस बाजारात येण्याची शक्यता आहे. गुगल ग्लास आताही बाजारात मिळतो, परंतु त्याची किंमत सुमारे 90 हजार रुपये आहे. अधिकृतरीत्या बाजारात आणताना या ग्लासची किंमत आणखी कमी होऊ शकते, असे सांगितले जात आहे.
2.9 टक्के शुल्क एका व्यवहारासाठी चुकते करावे लागतील.
90 हजार रुपये मोजावे लागणार एका गुगल ग्लाससाठी