आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जीआर 8 ! पुरस्कारप्राप्त महिलांना गीतांजली समूहाचा सलाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - येथे जीआर-8 हा महिला पुरस्कार वितरणाचा रंगारंग सोहळा नुकताच पार पडला. विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कार्याबद्दल समाजातील महिलांना या वेळी गौरवण्यात आले.

दुबईतील प्रसिद्ध रिसोर्ट मदिनात जुमैराहमध्ये हा पुरस्कार सोहळा रंगला. गीतांजली समूह आणि जीआर-8 यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. महिलांवरील अत्याचार, मुलींच्या कल्याणाची चळवळ या मुद्दय़ांना या निमित्ताने अधोरेखित करण्यात आले. त्याचबरोबर बीईटीआयच्या कामावरही प्रकाश टाकण्यात आला. बीईटीआय ही एनजीओ महिला सशक्तीकरणाच्या क्षेत्रात सक्रिय आहे. उदयोन्मुख मॉडेल अनुष्का रंजन बीईटीआयची ब्रँड अँम्बेसेडर आहे. महिलांच्या समस्येविषयी जागरूकता निर्माण करण्याचे कार्य केल्याबद्दल समूहाच्या वतीने अनुष्काला सन्मानित करण्यात आले. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडकडून या संस्थेला निधी मिळतो.