आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआलिशान सार्वजनिक इमारती संबंधित ठिकाण आणि तिथे राहणा-या लोकांच्या व्यक्तिमत्त्वाला समृद्धी देतात. न्यूयॉर्क शहरातील ग्रॅँड सेंट्रल टर्मिनल रेल्वे स्थानकाला या श्रेणीत ठेवता येईल. 2 फेब्रुवारी रोजी 100 वर्षे पूर्ण केलेली ही इमारत जगातील सर्वाधिक गौरवशाली सार्वजनिक ठिकाणांपैकी एक आहे.
1960 आणि 70 च्या शतकात ग्रॅँड सेंट्रल नष्ट होण्याच्या मार्गावर होते. त्या काळी रेल्वे प्रवास करणा-यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घसरण झाली होती. टर्मिनलची मालकी असलेल्या पेन सेंट्रल कंपनीने टर्मिनलच्या जागी 55 मजली टॉवर बांधण्याची योजना तयार केली होती. टर्मिनलचा ऐतिहासिक दर्जा नष्ट करण्यासाठी कंपनीने खटला दाखल केला होता. पेन स्टेशन बंद करण्यात आले. याने दुखावलेल्या न्यूयॉर्कमधील लोकांनी टर्मिनलला वाचवण्यासाठी आवाज उठवला. माजी राष्ट्राध्यक्ष कॅनेडी यांची पत्नी जॅकलिन कॅनेडी ओनासिसनेही शहरवासीयांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. 1976 मध्ये न्यूयॉर्कच्या लोकांनी लढाई जिंकली. तसे अनेक वर्षे उपेक्षित राहिल्याने स्टेशनची दुरवस्था झाली होती. ते जाहिरातीचे होर्डिंग्ज, बोर्डने खचाखच भरले होते.
परंतु 1998 पर्यंत स्टेशनचे रुपडे पालटले. बेयर ब्लाइंडर बेल्ले कंपनीने टर्मिनलचा परिसर आणि छताला अप्रतिम सौंदर्य बहाल केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.