आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Grand Reception Planned For PM Narendra Modi At Historic Melbourne Cricket Ground

दहशतवाद संपवण्यासाठी कठोर धोरण गरजेचे- नरेंद्र मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅनबेरा- दहशतवादही आज जागतिक समस्या आहे. ती निपटून काढण्यासाठी एका व्यापक धोरणाची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिपादित केली. भारत तीन दशकांपासून याचा सामना करत असल्याचे सांगून आता दहशतवादाचा विस्तार होत असल्याचेही ते म्हणाले. मंगळवारी ऑस्ट्रेलियाच्या संसदेत भाषणादरम्यान त्यांनी पाकिस्तानवरही अप्रत्यक्ष हल्लाबोल केला. जे देश दहशतवादाला प्रोत्साहन देत आहेत त्यांना एकटे पाडले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
पुढील स्लाइड्‍सवर पाहा फोटो...

गेल्या २८ वर्षांत ऑस्ट्रेलियाचा दौरा करणारे मोदी पहिलेचे भारतीय पंतप्रधान आहेत. त्यांनी संसदेतील भाषणात खासदारांना अक्षरश: मंत्रमुग्ध केले. भाषण संपले तेव्हा सभागृहात सलग ४२ सेकंद टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. चीनचा उल्लेख करता मोदी म्हणाले, हिंद आणि प्रशांत महासागरात दोन्ही देशांच्या जीवनरेषा आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया मिळून या भागातील सुरक्षा अधिक कडेकोट करू शकतात.

पाच करार...
१.सामाजिक सुरक्षा करार
उद्देश : दोन्हीदेशांच्या जनतेचा परस्पर संवाद. लाभ: परदेशातस्थायिक झालेल्यांनाही समान न्याय. सामाजिक सुरक्षा पेन्शनचे लाभ देणार.

२.कैद्यांची देवाण-घेवाण
उद्देश : विधीन्याय प्रशासनात सहकार्याचा प्रयत्न. लाभ: दुसऱ्यादेशात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना आपापल्या देशात परत आणणे सोपे.

३.पोलिस यंत्रणेत सहकार्य
उद्देश : मादकपदर्थांची तस्करी काळ्या पैशाला अटकाव. लाभ: तस्करीबाबतपूर्वसूचना मिळेल, दोषींची संपत्ती जप्त करता येईल.

४.कला-सांस्कृतिक सहकार्य
उद्देश : १९७१च्या करारानुसार दोन्ही देशांत सांस्कृतिक संबंध दृढ करणे. लाभ: व्यावसायिकतज्ज्ञ, प्रशिक्षण, प्रदर्शनात सहकार्य.

५.पर्यटन : उद्देश : पर्यटनधोरण, माहिती, टुर्स-ट्रॅव्हल एजन्सींना प्रोत्साहन देणे. लाभ: हॉटेलिंगक्षेत्रात गुंतवणूक. संसदेतील भाषणानंतर मोदी यांच्याभोवती ऑस्ट्रेलियन खासदारांनी असा गराडा घातला.
भारत उगवती महाशक्ती, लवकरच युरेनियम देणार : अॅबॉट
माेदींसोबतसंयुक्त पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट यांनी भारत उगवती महासत्ता असल्याचे नमूद केले. परिस्थिती योग्य असेल तर ऑस्ट्रेलिया लवकरच संरक्षणविषयक उपाययोजनांबरोबरच भारताला युरेनियम निर्यात करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले. पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत भारताशी मुक्त व्यापार करार करण्यात येईल, असेही अॅबॉट म्हणाले. युरेनियम पुरवठ्यासाठी नागरी आण्विक करार करण्याबाबत मोदींनी या दौऱ्यात भाष्य केले होते.