आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Great Love Story Of Cynthia Riggs And Howard Attebery, Divya Marathi

एका लग्नाची दुसरी गोष्‍टी...62 वर्षानंतर त्या दोघांनी केले शुभमंगल सावधान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नानंतर हॉवर्ड आणि सिंदिया - Divya Marathi
लग्नानंतर हॉवर्ड आणि सिंदिया
मॅसेच्युसेट्स - प्रेम जर खरे असेल, तर अंतर आणि वेळ गौण ठरते. काहीतरी असेच झाले हॉवर्ड अटबरी आणि सिंदिया यांच्याबरोबर. अमेरिकेच्या दिएगो शहरात रहिवासी असलेले हॉवर्ड अटबरी 1950 मध्‍ये 28 व्या वर्षी 18 वर्षांच्या सिंदिया रिग्सला कॅलिफोर्नियात भेटले होते. त्यावेळी दोघांनी काही दिवस एकत्र काम केले होते.
हॉवर्डला सिंदियाशी प्रेम झाले. पण त्यावेळी ती दुस-याच्या प्रेमात पडली होती. यामुळे हॉवर्डने आपल्या प्रेमाविषयी तिला सांगितले नाही. कामाच्या दरम्यान दोघे एकमेंकांना चिठ्ठी लिहुन संवाद साधायचे. यानंतर सिंदिया दुस-या शहरात निघून गेली. पण हॉवर्ड तिला विसरले नाही. दरम्यान सिंदियांने लग्न केले. तिला पाच मुले झाली. काही कारणावरून तिने पतीला घटस्फोट दिला. सिंदिया यानंतर एकटीच राहिला लागली. दुसरीकडे हॉवर्डनेही दोन विवाह केले. पण दुस-या पत्नीच्या निधना झाले व ते एकटेच राहायला लागले.
सिंदिया दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणार सातवी महिला ठरली, तर हॉवर्ड सूक्ष्‍मजीवशास्त्रज्ञ, दंतवैद्य आणि छायाचित्रकार आहेत. आयुष्‍यात इतक्या घडामोडी घडत असताना हॉवर्ड सिंदियाला विसरू शकले नाही. वयाच्या 62 व्या वर्षी त्याने तिला प्रेम पत्र लिहिले. ते हॉवर्डने कोड भाषेत लिहिले होते. जेव्हा सिंदियाने पत्र वाचले, तेव्हा तिला हॉवर्डची आठवण आली. तिने ताबडतोब पत्राला उत्तर दिले. दोघे मोठ्या ब्रेकनंतर मे 2012 मध्‍ये भेटले. भेटीत हॉवर्डने सिंदियाला लग्नाची मागणी घातली. एका चर्चमध्‍ये 92‍ वर्षांच्या हॉवर्डने 82 वर्षांच्या सिंदियाबरोबर शेवटी विवाह केलाच. सध्‍या दोघेही मॅसेच्युसेट्समध्‍ये सिंद‍ियाच्या घरी राहतात. या लग्नांने त्यांची मुलेही आनंदी आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा हॉवर्ड आणि सिंदिया यांच्या तरूणपणाची आणि विवाहाचे छायाचित्रे....