आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Greenland Glacier News In Marathi, Divya Marathi

Amazing: कालव्याच्या रूपात समुद्रास मिळते ग्रीनलँडच्या ह‍िमनद्यांतील बर्फ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रीनलँडमध्ये दूरवरपसरलेल्या हिमनद्यांच्या दरम्यान बर्फाळलेल्या पाण्याचा कालवा पर्यावरणतज्ज्ञांसाठी अभ्यासाचा विषय ठरला आहे. ते हिमनद्या वितळण्यामागची कारणे आणि त्यांचा वेग किती आहे याचा अभ्यास करतात. हे छायाचित्र ग्रीनलँडच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या रिंक हिमनदीचे आहे. येथूनच हिमनदीतील बर्फ वितळण्यास सुरुवात होते.
प्रारंभी ते नहरीसारखे दिसते. परंतु थोडे पुढे जाताच हा बर्फ नदीच्या रूपात समुद्रात मिसळतो. या हिमनद्या एका वर्षात १२.१ क्युबिक कमी अंतराइतक्या वाहून समुद्रास मिळतात. १९९६ मध्ये ही आकडेवारी निष्पन्न झाली. त्यानंतर किती हिमनद्यांचे बर्फ वितळून समुद्रास मिळाले आहे, हे आतापर्यंतच्या परीक्षणात समजू शकले नाही. या हिमनदीचे नामकरण डेन्मार्कचे भूवैज्ञानिक आणि ग्रीनलँडच्या पर्यावरणावर संशोधन करणा-या हेनरिक जोहान्स रिंक यांच्या नावाने करण्यात आले आहे.

greenlandtoday.com