आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील साक्षरतेचे वाढते प्रमाण आरोग्य सुधारणेस पोषक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- भारतातील गरीब नागरिकांच्या आरोग्यात झपाट्याने सुधारणा झाल्याचे दिसून येते आहे. वाढलेले उत्पन्न हे त्यामागचे कारण समजले जात होते. मात्र, या नागरिकांमध्ये वाढलेले साक्षरतेचे प्रमाण हे आरोग्य सुधारणेचे खरे कारण असल्याचा अहवाल ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठाने दिला आहे. सरासरी उत्पन्नापेक्षा साक्षरतेच्या वाढलेल्या प्रमाणाचा आरोग्य सुधारणेशी जवळचा संबंध असल्याचे या अहवालात म्हटले आहे.


सामाजिक सुधारणा तसेच सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी सरासरी उत्पन्न वाढीस अनुकूल धोरण आवश्यक असल्याचे मानले जात होते. मात्र, केंब्रिज विद्यापीठाने भारतात केलेल्या ‘सोशल सायन्सेस अँड मेडिसीन’ या अध्ययनातून हा समज मोडीत निघाला. साक्षरता ही थेट आर्थिक उत्पन्न देत नसली तरी तिचा सार्वजनिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो, असा या अध्ययनाचा निष्कर्ष आहे.


भारतात प्रमुख 500 जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. निरक्षरता हे गरिबीचे कारण असून, जेथे साक्षरतेचे प्रमाण अधिक तेथे गरिबीचे प्रमाण कमी आढळले. मात्र, तेथे आरोग्याची स्थिती तुलनेने समाधानकारक असून साक्षर लोक आरोग्य सुविधांचा योग्य लाभ घेत असल्याचे दिसून आले. आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी साक्षरतेचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. बालमृत्युदर एका संख्येने कमी करण्यासाठी गरिबीचे प्रमाण 25 % कमी करण्याची गरज आहे. मात्र, साक्षरतेचे प्रमाण 4 टक्क्यांनी वाढले तरीही हे उद्दिष्ट साध्य होऊ शकते.