आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Gujrat Administration Honest And Transfered, American Seneat Admirored Narendrabhai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरातचे प्रशासन प्रामाणिक व पारदर्शक, अमेरिकन सिनेटची नरेद्रभाईंचे केले कौतुक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या रिपब्लिकन संसदेने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी प्रशासनाचे कौतुक केले आहे. गुजरातचे प्रशासन प्रामाणिक आणि पारदर्शक असल्याचे अमेरिकन संसदेचे सदस्य आरोन शॉक यांनी म्हटले आहे. त्यामुळेच कंपन्या गुंतवणुकीसाठी गुजरातकडे आकर्षित होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शॉक यांनी मार्च महिन्यामध्ये मोदींबरोबर चर्चा केली होती. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी गुजरात सरकारवर स्तुतिसुमने उधळली. फोर्ड आणि टाटा मोटर्स गुजरातमध्ये अब्जावधींची गुंतवणूक करत असल्याचे त्यांनी मुलाखतीत सांगितले. अमेरिकेच्या कंपन्यांनीही गुजरातमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. त्याचे कारण म्हणजे तेथील सरकार प्रामाणिक, पारदर्शक आणि उदार आहे. गुजरात सरकारने उत्पादनानंतर त्याचा बाजारपेठेत पुरवठा करण्यासाठी चांगले रस्ते निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण केल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे. मात्र, ही सर्व स्तुती करताना त्यांनी संपूर्ण मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले नाही.

गर्व हेच भ्रष्टाचाराचे कारण : राज्यकर्त्यांचा अहंकार हेच भ्रष्टाचाराचे मुख्य कारण असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी एका कार्यक्रमात म्हणाले. नेते स्वत:ला सर्वाधिक ताकदवान समजतात. त्यांच्यामुळे कोणतेही काम होणार नाही असे त्यांना वाटते. पण नेत्यांनी स्वत:मध्ये देण्याची भावना निर्माण करण्याचे आवाहन अडवाणींनी केले.