आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदीनंतरही नरेंद्र मोदी झळकणार अमेरिकेत!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना व्हिसा नाकारला असला तरी ते अमेरिकेत आयोजित एका बैठकीत बीजभाषण करतील. अर्थात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते सहभागी होत असून व्हॉर्टन इंडिया इकॉनॉमिक फोरमची ही बैठक फिलाडेल्फियामध्ये 23 मार्चला होत आहे.
पेनसिल्व्हेनिया युनिव्हर्सिटीच्या व्हॉर्टन स्कूलमधील विद्यार्थ्यांनी ही बैठक आयोजित केली आहे. नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया आणि माहिती-प्रसारणमंत्री मिलिंद देवरा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. अन्य वक्त्यांमध्ये अदानी उद्योग समूहाचे गौतम अदानी, अभिनेत्री शबाना आझमी, जावेद अख्तर यांचा समावेश असून सोळा वर्षांपूर्वी व्हॉर्टन स्कूलमध्ये हा फोरम स्थापन करण्यात आला आहे.
भारतात औद्योगिकदृष्ट्या उपलब्ध संधी व उपाय यावर बैठकीत चर्चा होत असते. यापूर्वी माजी राष्टÑपती ए. पी. जे. अब्दुल कलाम, अर्थमंत्री पी. चिदंबरम, अनिल अंबानी व वरुण गांधी यांनीही बैठकीत मार्गदर्शन केले आहे. गुजरात दंगलीमध्ये मोदींवर आरोप झाले होते. यानंतर युरोपीय देश व अमेरिकेने त्यांना व्हिसा नाकारला होता. दरम्यानच्या काळात युरोपीय संघाने व्हिसाबंदीचा निर्णय मागे घेण्याचे संकेत दिले. मात्र, अमेरिकेने अजूनही मोदींवरील ही बंदी मागे घेतली नाही. या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रतिष्ठित कार्यक्रमात मोदींचे सहभागी होणे महत्त्वाचे मानले जात आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणीत मोदींचे जंगी स्वागत
नरेंद्र मोदी यांचे भाजपमध्ये वजन वाढत चालले असल्याचे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत पहिल्या दिवशी शुक्रवारी दिसून आले. पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांनी मोंदीचे खास स्वागत करत युरोपीय महासंघही त्यांच्या गुजरातमधील यशाचे कौतुक करत असल्याचा आवर्जून उल्लेख केला.