आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Gulzar Pakistan's Mid Tour Droped And Come Back India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तान दौरा अर्धवट सोडून गुलजार परतले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


लाहोर- प्रसिद्ध लेखक, गीतकार गुलजार व त्यांचे काही सहकारी बुधवारी पाकिस्तान दौरा अर्धवट सोडून भारतात परतले. दौरा अर्धवट सोडून परतण्यामागे गुलजार यांच्या तब्येतीचे कारण आहे.

‘देढ इश्किया’ चित्रपटासाठी पाकिस्तानी कलाकार मेहरअली व शेर अली यांच्यासोबत एक कव्वाली रेकॉर्ड करण्यासाठी गुलजार, चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज पाकमध्ये गेले होते.

यासंदर्भात भारद्वाजने सांगितले की, गुलजार जवळपास 70 वर्षांनी आपल्या जन्मगावी गेले होते. पंजाब प्रांतात दीनाजवळ कालरा येथे ते त्यांचे पालक व प्रसिद्ध शायर अहमद नसीम कासमी यांच्या कबरीवर गेले. तेथे ते बरेच भावूक झाले. यानंतर हॉटेलवर परतल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली.त्यामुळे हा दौरा रद्द करून भारतात परतण्याचा निर्णय घ्यावा लागला.यामागे इतर कुठलेही राजकारण नाही. गुलजार यांची तब्येत सुधारल्यानंतर आम्ही पुन्हा पाकिस्तान दौरा करणार आहोत. शुक्रवारपासून सुरू होणा-या कराची महोत्सवात गुलजार हे प्रमुख वक्त म्हणून सहभागी होणार होते.

‘आम्ही कुठलाही सल्ला दिला नाही’
दहशतवादी अफजल गुरुला फाशी दिल्यानंतर इस्लामाबादेतील भारतीय दूतावासाने सुरक्षेच्या कारणास्तव गुलजार यांचा दौरा रद्द केल्याचे वृत्त माध्यमांनी दिले होते. परंतु भारतीय दूतावासाकडून याचा इन्कार करण्यात आला असून आम्ही गुलजार यांना कुठलाही सल्ला दिलेला नाही. गुलजार हे खासगी दौ-यासाठी पाकिस्तानात आले होते. उच्चायुक्तालयातील कुणीही त्यांच्या संपर्कात नव्हते.’