आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gun Shot Fired Imran Khan\'s Car, News In Marathi

पाकिस्‍तान : इम्रान यांच्‍या \'स्‍वातंत्र्य दिन रॅली\' वर गोळीबार, मोठ्या प्रमाणावर दगडफेक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोओळ - पाकिस्‍तानच्‍या तहरीक-ए-इंसाफ पार्टीचे मुख्‍य अम्रान खान)
इस्‍लामाबाद - पाकिस्‍तानमध्‍ये 'स्‍वांतत्र्य दिन रॅली' काढणा-या तहरीक-ए-इंसाफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान आणि त्‍यांच्‍या कार्यकत्‍यांवर विरोधकांनी गोळीबार केला. या हल्‍याचे जिम्‍मेदार म्‍हणून इम्रान यांनी शरीफ सरकारवर आरोप केला आहे.
रॅलीवर गोळीबार, इम्रान सुरक्षित
पीटीआयचे प्रवक्त्‍या अनीला खान यांनी सांगितले की, गुजरांवालामध्‍ये इम्रान खान यांच्‍या वाहनावर गोळीबार झाला. तर काही लोकांनी इम्रानच्‍या जत्‍थ्‍थावर दगडफेकही केली. इम्रान सुरक्षित असून त्‍यांच्‍यासोबत पार्टीचे उपाध्‍यक्ष शाह महमूद आणि कुरैशी आणि अवामी मुस्लिम लीगचे लीडर शेख राशिदही उपस्थित होते.
अवामी मुस्‍लीम लीगच्‍या शेख राशिद यांनी एका स्‍थानिक वृत्‍तवाहिनीला दिलेल्‍या मुलाखतीमध्‍ये म्‍हटले की, आतापर्यंत अम्रान यांच्‍यावर आणि त्‍यांच्‍या कार्यकर्त्‍यांवर चार वेळेस हल्‍ला झाला असून त्‍यांच्‍या जीवनाला धोका आहे.
शरीफ यांना सत्‍तेवरुन खाली खेचण्‍याची मागणी
इम्रान खान आणि पाकिस्‍तान अवामी तहरीक (पीएटी) चे प्रमुख ताहिर उल-कादरी यांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्‍या राजीनाम्‍याची मागणी केली. आंदोलन करण्‍यासाठी ते कार्यकर्त्‍यांसमवेत लाहोरहून इस्‍लाबादला रवाना झाले होते.

इस्‍लामाबादला आले छावणीचे रुप
सरकारने रॅलीला रोखण्‍यासाठी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा सैनिक तैनात केले आहेत. कार्यकर्त्‍यांनी हिंसक होऊ नये त्‍यासाठी ही प्रतिबंधात्‍मक उपाययोजना केली आहे. इम्रान आणि कादरी यांचे दहा हजार कार्यकर्त्‍यांना रोखण्‍यासाठी पोलिस आणि सैनिक तैनात केले होते.
पुढील स्‍लाइडवर पाहा, गोळीबारात जखमी झालेल्‍या कार्यकर्त्‍यांची छायाचित्रे..