आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gunmen Abduct Afghan Deputy Minister In Kabul And Jordan Envoy

अफगाणिस्तानात उपसार्वजनिक बांधकाम मंत्री वाहिद यांचे दिवसाढवळ्या अपहरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबूल- अफगानिस्तानची राजधानी काबूलमध्ये काही अज्ञात बंदुकधार्‍यांनी देशाचे उपसार्वजनिक बांधकाममंत्री अहमद शाह वाहिद यांचे अपहरण केल्याची माहिती बांधकाम विभागाचे प्रवक्ता सोहेल काकर यांनी दिली.

वाहिद हे आज (मंगळवार) सकाळी आपल्या कारमधून उत्तर काबूलकडे जात होते. यावेळी काही बंदूकधार्‍यांनी त्यांच्या कारचा पाठलाग करत गोळीबार केला. कार चालक जखमी झाल्याने त्याने कार थांबवताच बंधुकधार्‍यांनी वाहिद यांचे अपहरण केले.
काबूलचे पोलिस गुल आगा हाशिम यांनी सांगितले, की उपमंत्री अहमद शाह यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.

दुसरीकडे, लिबियात जॉर्डनचे राजदूतांचेही अपहरण झाल्याचे समजते. त्रिपोलीत काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर हल्ला करून त्यांचे अपहरण केले.

उपमंत्री वाहिद यांच्या अपहरणकर्त्यांनी अद्याप कोणतीही मागणी केलेली नाही.
कोण आहेत वाहिद?
50 वर्षीय वाहिद यांनी इटलीमधून स्थापत्य तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतले आहे. चार वर्षांपासून ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपमंत्री आहेत. वाहिद यांचा कोणाशीही वाद नसल्याचे काकर यांनी सांगितले. दरम्यान, अफगाणिस्तानात पैशांसाठी अपहरणाच्या घटना वाढल्या आहेत.
दुसरीकडे, उपमंत्री वाहिद यांच्या अपहरणाशी काही संबंध नसल्याचे तालिबानीच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.
पुढे वाचा, त्रिपोलीत जॉर्डन राजदूत यांचे अपहरण...